सिंहगड रस्त्यावरील दुचाकी शोरुमला भीषण आग; २० ते २५ दुचाकी जळाल्या

By विवेक भुसे | Published: October 5, 2023 10:15 AM2023-10-05T10:15:49+5:302023-10-05T10:16:44+5:30

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्धा तासात आग आटोक्यात आणली

Sinhagad road bike showroom gutted by fire; 20 to 25 bikes were burnt | सिंहगड रस्त्यावरील दुचाकी शोरुमला भीषण आग; २० ते २५ दुचाकी जळाल्या

सिंहगड रस्त्यावरील दुचाकी शोरुमला भीषण आग; २० ते २५ दुचाकी जळाल्या

googlenewsNext

पुणे : सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती मंदिराजवळ असलेल्या एका दुचाकीच्या शोरुमला गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत २० ते २५ दुचाकी जळाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्धा तासात आग आटोक्यात आणली.

सिंहगड रोडवरील नवशा मारुती मंदिराजवळ टीव्हीएस दुचाकीचे शोरुम आहे. शोरुम बंद असताना आतून धूर येताना गुरुवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास लोकांच्या लक्षात आले. काही क्षणात आग भडकली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत गायकर, प्रभाकर उमराटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करुन आग अर्धा तासात आग आटोक्यात आणली. आगीत २० ते २५ दुचाकी जळाल्या. आगीमागचे नेमके कारण समजू शकले नाही. सध्या तेथे कुलिंगचे काम सुरु आहे.

Web Title: Sinhagad road bike showroom gutted by fire; 20 to 25 bikes were burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.