शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

एक ते सात वर्गांना एकच शिक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 13:54 IST

पालकांना चिंता : खेडच्या आदिवासी भागातील स्थिती

ठळक मुद्देप्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत एकूण २४ मुलांचा पटआदिवासी भागातील शाळांमध्ये २२ पदवीधर शिक्षक कमी पडत असून उपशिक्षक कमी

खेड : मोरोशी (ता. खेड) येथील प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवी असे सात वर्ग आहेत. मात्र, फक्त एकच शिक्षिका या शाळेत कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पंचायत समितीनेही याकडे दुर्लक्ष केल्याने पालक संताप व्यक्त करीत आहेत. आदिवासी भागातील मोरोशी येथील प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत एकूण २४ मुलांचा पट आहे.  जिल्हा परिषदेच्या नियमानुसार दोन पदवीधर व दोन उपशिक्षक असणे आवश्यक आहे. परंतु, येथे एकच शिक्षणसेवक म्हणून नव्याने रुजू झालेल्या शिक्षिका कार्यरत आहेत. दुसरी शिक्षिका गेली दोन वर्षे काही कारण न देता दोन वर्षांपासून रजेवर आहे. सातही वर्ग एकाच खोलीत भरत आहेत. त्या सर्व इयत्ता एकाच वर्गखोलीत शिक्षण घेत आहेत. अशीच स्थिती आदिवासी भागातील अनेक शाळांमध्ये आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक  गुणवत्तेबाबत पालक प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत.  विशेष बाब म्हणजे, शिक्षणसंस्थांमध्ये असलेले अनेक शिक्षक-शिक्षका कर्तव्य योग्यपणे बजावत असल्याचे दिसून येत नाही. अनेकदा शिक्षक रजेवर असल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. शिक्षकांच्या याच वर्तनाचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांना मिळणाºया शिक्षणावर होतो आहे. योग्य प्रकारे शिक्षण मिळत नसल्याने ते शिक्षणात कच्चेच राहतात. मात्र, शिक्षकांची कमतरता ही एकच चिंतेची बाब नाही, तर सर्व शिक्षा अभियान योजना, शिक्षण हक्क कायदा हे सर्व सरकारी योजना कायदे असूनही शेकडो आदिवासी, कातकरी मुले शिक्षणाच्या परिघाबाहेरच आहेत.  शिक्षणाची आवड, भविष्याचे कुतूहल विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणारा शिक्षक या दुर्गम भागात आवश्यक आहे. आज असलेल्या शिक्षकांमध्ये अपवाद शिक्षक या विचारांचे आहेत. या शिक्षकांनी सहकारी शिक्षकांचे उद्बोधन करून त्यांना या प्रवाहामध्ये, या कामासाठी सामील करून घेण्याची गरज आहे. त्यासाठी  प्रशासनाने प्राधान्याने शिक्षकांच्या संख्येचा आणि त्यांच्या प्रश्नांचा विचार करणे गरजेचे आहे.............आदिवासी भागातील शाळांमध्ये २२ पदवीधर शिक्षक कमी पडत असून उपशिक्षक कमी आहेत. न्यायालयीन प्रक्रिया चालू असल्याने जिल्हा परिषदेकडून शिक्षक उपलब्ध झाले नाहीत. आदिवासी भागातील या शाळांमध्ये शिक्षकांची केंद्रनिहाय उपलब्ध शिक्षकांमधून आवश्यक बदल व शिक्षकांची व्यवस्था केली जाईल. -  संजय नाईकडे, गटशिक्षणाधिकारी (पंचायत समिती, खेड)..........मोरोशी जिल्हा परिषद शाळेत जूनपासून एकच शिक्षक असल्याने आमच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. एक शिक्षक सात वर्ग कसा शिकवू शकतो? दोन दिवसांत शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास आम्ही आमची मुले शाळेतून काढून सोईनुसार इतर शाळेत प्रवेश घेऊ.- महादेव खंडागळे,  पालक, मोरोशी

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाEducationशिक्षणGovernmentसरकारTeacherशिक्षक