ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. शरद साठे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 15:31 IST2019-04-17T15:30:56+5:302019-04-17T15:31:58+5:30
सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय अभिजात संगीत क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला आहे.

ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. शरद साठे यांचे निधन
पुणे : ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक, संगीततज्ञ, सप्रयोग भाष्यकार पं. शरद साठे यांचे पुण्यात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय अभिजात संगीत क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला आहे. पं.द. वि पलुस्कर,प्रा.बा.र देवधर तसेच पं. शरदचंद्र आरोलकर अशा दिगग्ज गुरूंचे सान्निध्य त्यांना लाभले.ख्याल, टप्पा आणि तराणा अशा गायनप्रकारांवर त्यांचे उत्तम प्रभुत्व होते.ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे सुयोग्य विश्लेषण व अभ्यासपूर्ण सांगीतिक लिखाण अशा अनेक पैलूंनी त्यांचे व्यक्तिमत्व समृद्ध झाले आहे.' संगीत रिसर्च अकादमी',' पंडित विनायकबुवा पटवर्धन सन्मान', ' संगीतरत्न काशी- संगीत' अशा विविध पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत. देश विदेशातील मैफलीसोबत ' टप्पा' या प्रकारावर त्यांनी दिलेली व्याख्याने अभ्यासकांना उपयुक्त ठरली आहेत.