शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

आडत्यांचा बंद, महागाई शिगेला

By admin | Updated: June 6, 2014 23:33 IST

आडते असोसिएशनचा बेमुदत बंद सलग तिसर्‍या दिवशी कायम राहिल्याने किरकोळ बाजारात विक्रेते ठरवतील त्या किंमतीला भाजी घेण्याची वेळ खरेदीरांवर आली.

मार्केट यार्डात ६७ लाखांची उलाढाल, शेतकर्‍यांना मिळाला भाव पुणे : आडते असोसिएशनचा बेमुदत बंद सलग तिसर्‍या दिवशी कायम राहिल्याने किरकोळ बाजारात विक्रेते ठरवतील त्या किंमतीला भाजी घेण्याची वेळ खरेदीरांवर आली. बाजारात फळभाज्यांचे प्रतिकिलेचे भाव ३० ते ६० रुपयांदरम्यान आहेत. तर घेवडा १५०, हिरवी मिरची ६० व दोडका ६५, सिमला मिरचीचा भाव ८५ रुपये किलोवर पोहचला आहे. हमालीची टोळी पद्धत रद्द करावी या मागणीसाठी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनने बेमुदत बंद पुकारला आहे. पणन संचालकांनी केलेल्या आवाहनानुसार शेतकर्‍यांनी तब्बल ३ हजार ९४७ क्विंटल भाजीपाला बाजारात आणला. बाजारात दररोज १५० ते २०० गाड्या भाजी व फळांची आवक होते. त्या तुलनेत शुक्रवारी केवळ १७ टेम्पो व ८० लहान टेम्पो भाजी व फळांची आवक झाली. मात्र मागणी वाढल्याने सर्वच भाज्यांना चांगले दर मिळाले. त्यामुळे आवक कमी होऊनही बाजारात तब्बल ६७ लाखांची उलाढाल झाली. किरकोळ भाजी विक्रेते सचिन काळे म्हणाले, मार्केट यार्डात तुरळक आवक होत असली तरी मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने घाऊक बाजारातच भाज्यांचे भाव वाढलेले होते. सध्या हडपसर व चंदननगर येथील मार्केट मधून भाज्यांची खरेदी केली जात आहे. मात्र मागणीच्या तुलनेत तेथील आवकही तटपुंजीच आहे. त्यामुळे मर्यादित स्वरुपात भाजी मिळत असल्याने किरकोळ बाजारातील व्यापार्‍यांच्या दरातही मोठी तफावत दिसून येत आहे. बंदमुळे अनेक ठिकाणी विक्रेते मनाप्रमाणेच दर आकारत आहेत.मार्केट यार्डातील भाज्यांचे दहा किलोचे घाऊक दर (कंसात किरकोळ बाजारातील प्रतिकिलोचे दर) : कांदा १२०-२०० (३०), बटाटा २५० (३५), भेंडी २५०-३०० (३५-४०), गवार ३००-४०० (५०-६०), काकडी ८०-२०० (४५-५०), टोमॅटो ७०-१२० (२०), फ्लॉवर ८०-१०० (५५), घेवडा ७००-११०० (१५०), दोडका ३००-४०० (५०-६५), हिरवी मिरची ४००-५०० (६०), दुधी भोपळा ८०-१२० (५०). भाजीपाला (शंभर जुडीचा घाऊक दर व कंसात एका जुडीचा दर) - कोथिंबीर ४००-११०० (२५), मेथी ७००-१२०० (२५), शेपू ८००-१००० (२०).