तरुणीसोबतच्या शारीरिक संबंधांचे व्हिडिओ शूट करुन मित्राला पाठवलं; पोलिसांनी प्रियकराला ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 15:53 IST2021-09-02T15:48:03+5:302021-09-02T15:53:03+5:30
तरुणी अल्पवयीन असताना आरोपीने तिच्याबरोबर प्रेमसंबंध प्रस्थापित केले.

तरुणीसोबतच्या शारीरिक संबंधांचे व्हिडिओ शूट करुन मित्राला पाठवलं; पोलिसांनी प्रियकराला ठोकल्या बेड्या
पुणे : अल्पवयीन असताना तरुणीबरोबर शारीरिक संबंध करुन त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन ते तरुणीच्या वस्तीतील मुलांना पाठवून बदनामी करणाऱ्या तरुणाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.
निलेश सुभाष शेंडगे (वय २५, रा. लोहियानगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका १९ वर्षाच्या तरुणीने येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना ऑक्टोंबर २०१८ ते ३० ऑगस्ट २०२१ दरम्यान घडली. येरवडा पोलिसांनी बलात्कार तसेच पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
ही तरुणी अल्पवयीन असताना निलेश शेंडगे याने तिच्याबरोबर प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तिच्या इच्छेविरुद्ध मित्रांच्या रुमवर व इतर ठिकाणी नेऊन तिच्याशी शारिरीक संबंध निर्माण केले. त्याचे व्हिडिओ बनविले. या संबंधातून ती गर्भवती राहिल्यावर त्याने बहिणीच्या मदतीने तिचा गर्भपात करविला. तिने लग्नाविषयी विचारल्यावर निलेश याने तिच्याबरोबर लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने फिर्यादी रहात असलेल्या वस्तीमधील मुलांना तिचा व्हिडिओ पाठवून तिची बदनामी केली. येरवडा पोलिसांनी निलेश शेंडगे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक डोंगरे अधिक तपास करीत आहेत.