Video: खंडोबा गडाच्या पायथ्याशी भाविकांकडून दुकानदाराला बेदम मारहाण;गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 13:19 IST2026-02-03T13:17:10+5:302026-02-03T13:19:05+5:30

याबाबत जेजुरी पोलिस ठाण्यात अद्याप कोणतीही फिर्याद दाखल झालेली नव्हती.

Shopkeeper brutally beaten up by goon devotees at the foot of Khandoba fort | Video: खंडोबा गडाच्या पायथ्याशी भाविकांकडून दुकानदाराला बेदम मारहाण;गुन्हा दाखल

Video: खंडोबा गडाच्या पायथ्याशी भाविकांकडून दुकानदाराला बेदम मारहाण;गुन्हा दाखल

जेजुरी :महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडाच्या पायथ्याशी भंडार खोबरे दुकानदार व भाविक यांच्यात झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे रूपांतर मारामारीत झाले. यावेळी पाच ते सहा जणांच्या संतप्त टोळक्याने भंडार खोबरे दुकानदार महादेव श्रीरंग वाघमारे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, डोक्यात काठी मारल्याने त्यांच्या डोक्याला जखम झाली. संतप्त भाविकांनी दुकानाची तोडफोड केली.

हा प्रकार शनिवारी (दि. ३१) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. याबाबत जेजुरी पोलिस ठाण्यात अद्याप कोणतीही फिर्याद दाखल झालेली नव्हती. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास काही भाविक खंडोबा गडावर जात होते , यावेळी दुकानाजवळ चप्पल ठेवण्यावरून या भाविकांचा दुकानदाराशी वाद झाला. त्यानंतर हे भाविक गडावर जाऊन आल्यावर पुन्हा वाद पेटला. यावेळी संतप्त भाविकांनी दुकानाची तोडफोड केली.

हातात दांडकी घेऊन दहशत निर्माण केली. येथे पाच कामगार काम करतात. या कामगारांनी घाबरून दुकानाजवळील घरात जाऊन दार लावून घेतले. हे दार तोडण्यासाठी या भाविकांनी दरवाजावर लाथा घातल्या. लाकडी दांडक्याने दार तोडण्याचा प्रयत्न केला . मात्र दार न तुटल्याने आत लपून बसलेले कामगार बचावले. या संदर्भात काल ( दि. १ ) महादेव वाघमारे यांनी अज्ञात पाच ते सहा आरोपीविरुद्ध जेजुरी पोलिस ठाण्यात रीतसर फिर्याद नोंदवली आहे. पुढील तपास जेजुरी पोलिस करीत आहेत.

Web Title : जेजुरी: खंडोबा मंदिर में दुकान पर तीर्थयात्रियों का हमला; मामला दर्ज।

Web Summary : जेजुरी के खंडोबा मंदिर में दुकान पर तीर्थयात्रियों ने विवाद के बाद हमला किया। पुलिस ने हमलावरों के खिलाफ मामला दर्ज किया।

Web Title : Jejuri: Shopkeeper beaten by pilgrims at Khandoba temple; case filed.

Web Summary : A shopkeeper at Jejuri's Khandoba temple was brutally assaulted by pilgrim mob following a dispute. Police filed a case against the attackers.