मित्राच्या पत्नीला फोन करतो म्हणून गोळीबार; एक जण जखमी, खेड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 16:09 IST2023-11-24T16:06:16+5:302023-11-24T16:09:26+5:30

जखमीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असून फरार आरोपीचा खेड पोलिस शोध घेत आहे

Shooting for calling a friend wife One person injured incident in Khed taluka | मित्राच्या पत्नीला फोन करतो म्हणून गोळीबार; एक जण जखमी, खेड तालुक्यातील घटना

मित्राच्या पत्नीला फोन करतो म्हणून गोळीबार; एक जण जखमी, खेड तालुक्यातील घटना

राजगुरूनगर: मित्राच्या पत्नीला फोन करतो या कारणावरुन एकावर गोळीबार करून जीवघेणा हत्ला झाल्याची घटना दि२३ (चांदुस ता खेड ) येथे घडली आहे. जखमी शुभम संतोष तांबे (वय २० रा. आसखेड बुद्रुक ता खेड ) यांने खेड पोलीस ठाण्यात हल्ल्याची फिर्याद दिली आहे
          
या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम तांबे हा केतन कारले यांच्या पत्नीला फोन करतो या कारणावरून सात महिन्यापुर्वी या दोघांचा वादावाद झाला होता. यांच भांडणाच्या कारणातुन केतन कारले यांने शुभम तांबे याला फोन करुन अंकुर कारले हा मला मारणार आहे तु माझे घरी येवुन मला घेवुन जा असे सांगुन घरी बोलविले. अंकुर कारले ( रा चांदूस ता खेड ) हा तेथे होता. त्याने पिस्तुलाने केतन कारले यांचे पत्नीच्या कारणावरुन व झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन शुभम तांबे यांच्या पोटात गोळी मारुन गंभीर जखमी केले. अशी माहिती खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक राजकुमार केंद्रे यांनी दिली. जखमी तांबे याला पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असून फरार आरोपीचा खेड पोलिस शोध घेत आहे.

Web Title: Shooting for calling a friend wife One person injured incident in Khed taluka