Karegaon Crime: धक्कादायक! पुण्यात मामाच्या मुलासमोर तरुणीवर सामूहिक बलात्कार, जिल्हा पुन्हा हादरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 22:54 IST2025-03-02T22:53:01+5:302025-03-02T22:54:23+5:30
Pune Karegaon Rape Case: पीडितेसह तिच्या मामेभावाला जीवे मारण्याची धमकी देऊन नराधमांनी आळीपाळीने तरुणीवर बलात्कार केला.

Karegaon Crime: धक्कादायक! पुण्यात मामाच्या मुलासमोर तरुणीवर सामूहिक बलात्कार, जिल्हा पुन्हा हादरला
Pune Rape Case: पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात तरुणीसोबत घडलेल्या घटनेमुळे राज्यात निर्माण झालेला आक्रोश कायम असतानाच जिल्ह्यात आणखी एक संतापजनक घटना घडली आहे. शिरूर तालुक्यातील कारेगाव इथं एका युवतीवर दोन नराधमांनी बलात्कार केला. अमोल नारायण पोटे (वय २५ वर्षे रा. कारेगाव ता. शिरूर जि.पुणे. मूळ रा. ढोकराई फाटा ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर आणि २) किशोर रामभाऊ काळे (वय २९ वर्षे, रा. कारेगाव ता. शिरूर जि. पुणे, मूळ रा. किल्ले धारूर ता. धारूर जि. बीड) अशी आरोपींची नावे आहेत.
या घटनेबाबतची अधिक माहिती अशी की, कारेगाव इथं पीडित तरुणी व तिचा मामे भाऊ असे दोघे घरापासून काही अंतरावर गप्पा मारत असताना आरोपी अमोल पोटे आणि किशोर रामभाऊ काळे हे मोटार सायकलवरून आले आणि चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने तरुणीच्या मामेभावाला तिच्यासोबत शरीरसंबध करण्यास भाग पाडून त्यांचे मोबाईलमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढले. तसंच नंतर पीडितेसह तिच्या मामेभावाला जीवे मारण्याची धमकी देऊन नराधमांनी आळीपाळीने जबरदस्तीने शरीरसंबंध केले. तसंच पीडित तरुणीच्या गळ्यातील सोन्याचा बदाम व नाकातील सोन्याची रिंग जबरदस्तीने काढून घेतले आहेत.
दरम्यान, या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसंच न्यायालयाने पोलिस कस्टडी रिमांड मंजूर केले आहे.