एअर फोर्समधील निवृत्त अधिकार्‍याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 10:50 IST2021-08-18T10:50:33+5:302021-08-18T10:50:42+5:30

विमानतळ पोलिसांनी कारवाई करुन केली दोघांना अटक; पाच जणांवर गुन्हा दाखल

Shocking way to trap a retired Air Force officer in a honey trap ... | एअर फोर्समधील निवृत्त अधिकार्‍याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार...

एअर फोर्समधील निवृत्त अधिकार्‍याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार...

ठळक मुद्देप्रकरण मिटविण्यासाठी त्यांच्याकडे केली होती ५० लाखांची मागणी

पुणे : कोंढव्यात पनवेल येथील व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याला लुबाडण्याची घटना घडली असतानाच चंदननगर येथील एका एअरफोर्समधील निवृत्त अधिकार्‍यालाही हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दत्ता ऊर्फ यादव कुर्‍हाडे ( वय ४८, रा. लवणवाडी, जुन्नर), उत्तम कान्हुजी कुर्‍हाडे (वय ४०) या दोघांना अटक केली आहे.  नारायण जाधव (वय ३७, रा. कैवानमळा, जुन्नर), अनिल सर ऊर्फ भाऊ आणि आरती चौधरी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चंदननगर येथील एका ५९ वर्षाच्या निवृत्त एअर फोर्स अधिकार्‍यांनी फिर्याद दिली आहे.

निवृत्त अधिकारी विमाननगर येथील युनियन बँक ऑफ इंडिया येथे गेले असताना आरती चौधरी असे नाव सांगणार्‍या एका तरुणीने त्यांना फोन केला. नोकरीची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी आपण व्यवसाय करत असून माझ्याकडे काही नोकरी वगैरे नाही़ असे सांगितले. तिने व्हाटसअ‍ॅपवर त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांची सर्व माहिती घेऊन प्रेमाचे नाटक केले.

त्यानंतर त्यांना १२ ऑगस्ट रोजी नारायणगाव येथे बोलावले. तेथून ती अधिकाऱ्यांना एका ठिकाणी घेऊन गेली. त्यांच्याबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तेथे तिचे नातेवाईक आले. तेव्हा त्यांनी आपल्यावर जबरदस्तीने शरीर संबंध केल्याचे खोटे सांगितले. त्यावर त्यांच्यातील एकाने अधिकाऱ्याच्या गळ्याला कुर्‍हाड लावून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हे प्रकरण मिटविण्यासाठी त्यांच्याकडे ५० लाखांची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती अधिकाऱ्याकडून युनियन बँक ऑफ इंडियाचे १० लाख रुपयांचे तीन धनादेश जबरदस्तीने लिहून घेतले. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

या प्रकारानंतर सोमवारी पुन्हा त्यांना आरोपींनी फोन करुन पैशांची मागणी केली. तेव्हा निवृत्त अधिकारी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. विमानतळ पोलिसांनी तातडीने कारवाई करुन पैसे घेण्यासाठी आलेल्या दोघांना सापळा रचून अटक केली. विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवदास लहाने तपास करीत आहेत.

Web Title: Shocking way to trap a retired Air Force officer in a honey trap ...