बारामतीतील धक्कादायक प्रकार! हवालदारानेच घेतली चक्क '१ लाख १० हजारांची लाच'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 11:20 AM2021-08-02T11:20:32+5:302021-08-02T11:20:39+5:30

तालुका पोलीस ठाण्यातील हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले

Shocking type in Baramati! Constable took bribe of Rs 1 lakh 10 thousand | बारामतीतील धक्कादायक प्रकार! हवालदारानेच घेतली चक्क '१ लाख १० हजारांची लाच'

बारामतीतील धक्कादायक प्रकार! हवालदारानेच घेतली चक्क '१ लाख १० हजारांची लाच'

googlenewsNext
ठळक मुद्दे मारहाणीच्या प्रकरणातून तक्रारदार तरुणाचे नाव कमी करण्यासाठी व त्याच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी मदत करण्यासाठी केला हा प्रकार

पुणे : मारामारीच्या गुन्ह्यात तक्रारदाराचे नाव न घेण्यासाठी एका पोलीस हवालदाराने चक्क १ लाख १० हजारांची लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून या हवालदाराला रंगेहाथ पकडले.

दादासाहेब नामदेव ठोंबरे (वय ५०) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. दादासाहेब ठोंबरे हा बारामती तालुका पोलीस ठाण्यात नेमणूकीला होता. याप्रकरणी एका २८ वर्षाच्या तरुणाने तक्रार दिली आहे.

मारहाणीच्या प्रकरणातून तक्रारदार तरुणाचे नाव कमी करण्यासाठी व त्याच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी मदत करण्यासाठी दादासाहेब ठोंबरे याने १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागितली. या तरुणाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यांनी केलेल्या पडताळणीत तोडजोड होऊन ठोंबरे याने १ लाख १० हजार रुपये घेण्याचे मान्य केले. 

उपअधीक्षक विजयमाला पवार आणि त्यांच्या पथकाने यांनी सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून १ लाख १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दादासाहेब ठोंबरे याला रंगेहाथ पकडण्यात आले. बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादासाहेब ठोंबरे याला अटक केली असून पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Shocking type in Baramati! Constable took bribe of Rs 1 lakh 10 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.