धक्कादायक ! महिलेने संमतीने मित्रासोबत केलेल्या शारीरिक संबंधाचे छुप्या कॅमेऱ्याने चित्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 11:41 IST2019-09-24T11:41:11+5:302019-09-24T11:41:27+5:30
आरोपी वकिलाने तसेच त्यांची आशील असलेल्या एका महिलेने बेडरूममध्ये स्पाय कॅमेरा बसविला.

धक्कादायक ! महिलेने संमतीने मित्रासोबत केलेल्या शारीरिक संबंधाचे छुप्या कॅमेऱ्याने चित्रण
पिंपरी: महिलेने मित्रासोबत संमतीने केलेल्या शारीरिक संबंधाचे छुप्या कॅमेऱ्याने चित्रण केले. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पसरविण्याची धमकी देऊन मोठ्या रकमेची मागणी केली. याप्रकरणी पुण्यातील प्रख्यात वकील व एका महिलेसह तिघांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे निलख येथे हा प्रकार घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅड. अभिजीत सरवटे, असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपी अॅड. सरवटे याने तसेच त्यांची आशील असलेल्या एका महिलेने बेडरूममध्ये स्पाय कॅमेरा बसविला. त्यासाठी एका जणाची मदत घेतली.फिर्यादी महिलेने तिच्या मित्रासोबत संमतीने केलेल्या शारीरिक संबंधाचे चित्रण करून त्याचे व्हिडिओ तयार केले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरविण्याची फिर्यादी महिलेच्या मित्राला धमकी दिली. फिर्यादीच्या वैयक्तिक जीवनातील खासगी कृत्य चित्रित करून ते पसरवून त्याच्या ओळखीच्या प्रतिष्ठित लोकांना दाखविले. त्यांनी याबाबत फिर्यादी महिलेला सांगितले. तसेच सदरचे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरविण्याचे सांगून महिलेच्या मित्राकडून आरोपींनी मोठ्या रकमेची मागणी केली. महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. एस. गवळी तपास करीत आहेत.