धक्कादायक ! दारुच्या नशेत तरुणाने वडीलांच्या हाताचा घेतला चावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 12:46 IST2020-01-23T12:45:12+5:302020-01-23T12:46:01+5:30

दारुच्या नशेत मुलाने आई- वडिलांना मारहाण केल्याची घक्कादायक घटना विमाननगर येथे घडली आहे.

Shocking! A drunk man bites his fathers hand | धक्कादायक ! दारुच्या नशेत तरुणाने वडीलांच्या हाताचा घेतला चावा

धक्कादायक ! दारुच्या नशेत तरुणाने वडीलांच्या हाताचा घेतला चावा

विमाननगर : दारूच्या नशेत कोण काय करेल याचा नेम नाही. अशाच एका घटनेत दारुच्या नशेत मुलानेच वडीलांच्या हाताला चावा घेत, आईचे केस ओढत गंभीर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार येरवड्यात घडला. या प्रकरणी दारुड्या मुलाला पोलीसांनी तात्काळ अटक केली आहे. यापूर्वी देखील या विक्षिप्त व्यसनी तरुणाने भावासह शेजारच्यांना देखील मारहाण केली आहे. 

एका दुसऱ्या भाजीत पालकची भाजी का टाकली म्हणून वडीलांना चावा घेत आईला मारहाण करणाऱ्या व्यसनाधीन मुलाला येरवडा पोलिसांनी अटक केली. विजय धर्मा सनादे (वय 21,रा.जाधवनगर,येरवडा)याला त्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. विजय याला दारूचे व्यसन आहे. दारू पिल्यानंतर तो कोणालाही कोणत्याही कारणासाठी मारहाण करतो. मंगळवारी घरात एका भाजीत पालक का टाकला या किरकोळ कारणावरून विजय याने वडील धर्मा यांच्या हाताला व शरीरावर अनेक ठिकाणी चावे घेतले. भांडणे सोडवण्यासाठी मध्ये गेलेल्या आईचे केस ओढत मारहाण केली. या सर्व गंभीर प्रकारानंतर त्याच्या आईवडीलांच्या तक्रारीवरून येरवडा पोलीसांनी आरोपी विजय याला अटक केली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक बलभिम ननावरे करीत आहेत.

Web Title: Shocking! A drunk man bites his fathers hand