शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

खळबळजनक! पाचशेहुन अधिक गुंतवणूकदारांना २०० कोटींचा गंडा घालत 'शेठजी' फरार; हवेली तालुक्यातील प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 6:18 PM

गुंतवणुकदारांनी पन्नास लाखांपासुन ते दहा कोटी रुपयांपर्यंतच्या भिशीत गुंतवणुक केलेली आहे..

ठळक मुद्देलोणी काळभोर पोलिस ठाण्यात काही गुंतवणुकदारांनी लेखी स्वरुपात दिली तक्रार

उरुळी कांचन : भिशीत गुंतवणुकीच्या नावाखाली उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका बड्या व्यापाऱ्याने उरुळी कांचन,लोणी काळभोर, हडपसरसह पुर्व हवेलीमधील सुमारे पाचशेहुन अधिक "बड्या" आसामींकडून दोनशे कोटीहुन अधिकची माया जमा करुन आपल्या कुटुंबिंयासह उरुळी कांचन येथुन पोबारा केल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले असल्याची घटना पूर्व हवेलीत घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.                 

उरुळी कांचन व परिसरात अशा प्रकारे भिशी चालवणाऱ्या व अनधिकृतपणे व्याजाच्या पैश्याचा व्यवहार करणाऱ्या मंडळींना त्यांच्या नावापुढे "शेठ" लावून मान देण्याची प्रथा सर्रास चालू आहे. असाच एक भिशी चालक व्यापारी कुटुंबिंयासह महिन्याभरापासुन फरार झाल्याने "घी गया अन बडघा भी गया" अवस्था गुंतवणुकदारांची झाली आहे. फसविल्या गेलेल्या पाचशेपैकी काही गुंतवणुकदारांशी या व्यापाऱ्याचा फोनवरुन संपर्क होत असला तरी महिन्याभऱापूर्वी त्याने पोबारा केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी या व्यापाऱ्याच्या विरोधात उरुळी कांचन गावातील काही गुंतवणुकदारांनी लोणी काळभोरपोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.         सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भिशीची हप्ते भरणे अनेक जण टाळत असल्याने, भिशीच्या लिलावानंतर पैसे मिळण्यास शेठकडून विलंब वाढताच गुंतवणूकदारांनी त्याला जेरीस आणण्यास सुरवात करताच या व्यापाऱ्याने कुटुंबाला घेऊन उरुळी कांचनमधील राहत्या घरातून धूम ठोकली. मात्र, पंधरा दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीला कोरोना झाल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथून त्याने पत्नी व मुलांना घेऊन पळ काढला. 

पैसे थकलेल्यापैकी एका बड्या गुंतवणुकदाराने सांगितले, उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीमधील अनेक मातब्बर गुंतवणुकदारांनी पन्नास लाखांपासुन ते दहा कोटी रुपयांपर्यंतच्या भिशीत गुंतवणुक केलेली आहे. पूर्व हवेली व दौंड तालुक्यातील पाचशेहुन अधिक गुंतवणुकदारांना अडीचशे कोटींच्या आसपास गंडा घातला असण्याची शक्यता आहे.            याबाबत उरुळी कांचन पोलिस चौकीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन चौधरी म्हणाले, भिशीत गुंतवणुकीच्या नावाखाली उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका नामांकित व्यापाऱ्याने लोणी काळभोर, उरुळी कांचन, हडपसरसह पुर्व हवेलीमधील अनेकांना गंडा घातल्याची माहिती आहे. निश्चित रक्कम व फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या याविषयी आत्ताच काही सांगता येणार नाही.  

टॅग्स :uruli kanchanउरुळी कांचनfraudधोकेबाजीPoliceपोलिसLoni Kalbhorलोणी काळभोर