धक्कादायक ! जामिनावर सुटून आराेपीचा महिलेवर बलात्काराचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 19:25 IST2020-02-07T19:24:18+5:302020-02-07T19:25:20+5:30

जामिनावर असलेल्या आराेपीने पिडीत महिलेवर पुन्हा बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना काेरेगाव भीमा येथे घडली आहे.

Shocking! accused on bail tries to rape victim | धक्कादायक ! जामिनावर सुटून आराेपीचा महिलेवर बलात्काराचा प्रयत्न

धक्कादायक ! जामिनावर सुटून आराेपीचा महिलेवर बलात्काराचा प्रयत्न

कोरेगाव भीमा :  येथे एका महिलेवर बलात्कार करून मारहाण तसेच गर्भपात केल्याची घटना घडली आहे. पिडीतेने लोणीकंद पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली हाेती. याप्रकरणी आराेपीला अटकपूर्व जामीन मिळाल्याने आरोपीकडून फियार्दी महिलेस तक्रार मागे घेण्यासाठी दमदाटी करून बलात्काराचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना कोरेगाव भीमा येथे घडली आहे. शिक्रापुर पोलीसांनी आरोपी राहुल वाळके याला अटक केली आहे.

कोरेगाव भीमा ता. शिरूर येथील पिडीत महिलेची पैशाच्या व्यवहारातून पेरणे गावातील राहुल वाळके याचेसोबत ओळख झाली, त्यानंतर आराेपीने पिडीत महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यांनतर महिलेला गुंगीचे औषध देत जादुटाेना करुन पिडीतेवर वांरवार बलात्कार केला. तसेच एका हॉस्पिटलमध्ये नेऊन महिलेच्या पतीच्या खोट्या सह्या करून महिलेला गर्भपात करण्यास भाग पाडले. पिडीतेला सर्व प्रकार असाह्य झाल्यानंतर देखील महिलेवर जीवघेणा हल्ला करत जीवे ठार मारण्याची धमकी आराेपीने दिली, याबाबत पिडीत महिलेने लोणीकंद पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने लोणीकंद पोलिसांनी राहुल संजय वाळके (रा. पेरणे फाटा ता. हवेली जि. पुणे) याचे विरुद्ध बलात्कार, गर्भपात, मारहाण तसेच जादूटोणा कायद्यानुसार गुन्हे दाखल केले होते.

आरोपीने न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला. जामिनावर सुटून आलेल्या आराेपीने पीडितेच्या घरी जात तिला मारहाण करत तक्रार मागे घेण्यास सांगितले. तसेच पिडीतेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत जीवे मारण्याची धमकी दिली. पिडीतेने याबाबत शिक्रापूर पाेलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. पाेलिसांनी आराेपीला अटक केली असून त्यावर दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर हे करत आहेत.

Web Title: Shocking! accused on bail tries to rape victim