शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
4
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
5
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
6
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
7
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
8
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
9
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
10
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
11
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
12
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
13
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
14
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
15
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
16
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
17
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
18
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
19
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
20
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
Daily Top 2Weekly Top 5

शिवराज्याभिषेक दिन विशेष: औरंगजेबाने केले होते रायगडाचे इस्लामगड, नाव बदलण्याची प्रथा जुनीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 19:51 IST

एखादा प्रांत जिंकल्यानंतर त्याचे नाव पूर्वी बदलण्याची प्रथा होती....

- श्रीकिशन काळे

पुणे : राज्य व केंद्र सरकारने सध्या शहराचे नाव बदलण्याचा सपाटा लावला आहे. परंतु, नाव बदलण्याची परंपरा शिवरायांच्या काळापासून असल्याची नोंद आहे. त्या काळात औरंगजेबाने रायगड किल्ला जिंकला तेव्हा त्याचे नाव इस्लामगड ठेवले होते. एखादा प्रांत जिंकल्यानंतर त्याचे नाव पूर्वी बदलण्याची प्रथा होती. आज मात्र केवळ राजकीय सोय आणि मतांसाठी नाव बदलले जात असल्याचे दिसून येत आहे.

देशातील आणि राज्यातील अनेक शहरांची नावे बदलण्यात आली. महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे केले आहे. त्यानंतर गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नाव अहिल्यादेवीनगर करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.

मुस्लिम राजवटीने जेव्हा मराठा साम्राज्यातील किल्ले जिंकले, तेव्हा त्याची नावे बदलली होती. स्वराज्याची राजधानी रायगडचे नाव देखील बदलले होते. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ही माहिती इतिहास लेखक प्रा. प्र. के. घाणेकर यांनी ‘लोकमत’ला दिली. ते म्हणाले,‘‘इतिकदकखानाने रायगड जिंकला होता. त्याचा औरंगजेबाने मोठा सन्मान केला. त्याला झुल्फिकारखान किताब दिला. रायगडाचे नवे नाव इस्लामगड असे ठेवले होते. हे सारे कागदोपत्री झाले. तरी तसा एक अधिकृत शिलालेख खुद्द रायगडावर बसवायचा हुकूम निघाला. या साऱ्या घटना १६८९-९० मधील आहेत. प्रत्यक्ष शिलालेख तयार व्हायला १६९५ साल उजाडले. मात्र तो रायगडावर बसवण्याच्या कामात बरीच चालढकल झालेली दिसते. कारण तो रायगडावर नेऊन बसवण्याचे काम कधी झालेच नाही.’’

शिलालेख गेला कुठे?
मी पाहिला तेव्हापासून पाचाडच्या कोटाच्या दर्शनी बुरूजावर शिलालेख होता. पुढे १९७४ नंतर पाचाड-रायगडाची साफसफाई, जीर्णोध्दार, दुरुस्त्या आदी सुरू झाल्यावर तो शिलालेख तेथून काढून ठेवला. तो सध्या नेमका कुठे आहे, याची कल्पना नाही. कदाचित केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाच्या शीव-मुंबई येथील कार्यालयाच्या संग्रहात हलविला गेला असावा, असे इतिहास लेखक प्रा. प्र. के. घाणेकर यांनी सांगितले.

रायगडाचे पूर्वी तणस, रायरी असे अनेक नावे होती. त्यानंतर रायगड झाले. औरंगजेबाने किल्ला जिंकला तेव्हा इस्लामगड नाव दिले. त्यानंतर पुन्हा तो रायगड नावाने ओळखला जाऊ लागला. इंग्रजीत याचा गोंधळ करतो आपण raigad लिहितो. हे चुकीचे आहे. राईगड असा उच्चार होतो. रायगडचे नाव raigad असे लिहायला हवे; पण कोणीही त्याकडे लक्ष देत नाही. आता अहिल्यादेवीनगर नाव हे योग्य आहे का? ग्रंथपुराणात त्याचे नाव अहल्यादेवी आहे. नाव देताना तज्ज्ञांकडून तपासले पाहिजे.
- प्रा. प्र. के. घाणेकर, इतिहास अभ्यासक

टॅग्स :RaigadरायगडPuneपुणेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivrajyabhishekशिवराज्याभिषेक