मोठी बातमी! शिवसेनेच्या विद्यमान आमदाराच्या मुलाचे पुण्यातून अपहरण; पोलिसांकडून तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 19:42 IST2025-02-10T18:57:41+5:302025-02-10T19:42:13+5:30

माजी मंत्र्यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.

Shiv Sena Leader Tanaji Sawant son kidnapped missing from Pune airport | मोठी बातमी! शिवसेनेच्या विद्यमान आमदाराच्या मुलाचे पुण्यातून अपहरण; पोलिसांकडून तपास सुरु

मोठी बातमी! शिवसेनेच्या विद्यमान आमदाराच्या मुलाचे पुण्यातून अपहरण; पोलिसांकडून तपास सुरु

किरण शिंदे

Tanaji Sawant Son: माजी मंत्री आणि शिवसेना विद्यमान आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा पुण्यातून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी अपहरणाची तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा अचानक बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

तानाजी सावंत यांच्या मुलाचे पुण्यातून अपहरण करण्यात आले. पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नऱ्हे परिसरातून स्विफ्ट गाडीतून त्याचे अपहरण करण्यात आले अशी माहिती समोर आली आहे. सिंहगड रोड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Shiv Sena Leader Tanaji Sawant son kidnapped missing from Pune airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.