बलात्कार करून गर्भपात केल्याप्रकरणी शिवसेनेच्या 'या' मोठ्या नेत्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 11:34 IST2022-02-17T11:23:21+5:302022-02-17T11:34:42+5:30

शिवसेनेच्या उपनेत्यावर बलात्काराचे आरोप...

shiv sena deputy leader raghunath kuchik charged with rape molested girl | बलात्कार करून गर्भपात केल्याप्रकरणी शिवसेनेच्या 'या' मोठ्या नेत्यावर गुन्हा दाखल

बलात्कार करून गर्भपात केल्याप्रकरणी शिवसेनेच्या 'या' मोठ्या नेत्यावर गुन्हा दाखल

पुणेलग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी शारीरीक संबंध करुन तिला गरोदर केले. तसेच जबरदस्तीने गर्भपात करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कामगार नेते आणि शिवनेतेचे उपनेता याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रघुनाथ बबनराव कुचिक (raghunath kuchik) (रा. येरवडा) असे या शिवसेना उपनेत्याचे नाव आहे. याप्रकरणी एका २४ वर्षाच्या तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मॉडेल कॉलनीतील प्रबोधन फाऊंडेशन, प्राईड हॉटेल, गोव्यातील बेलीझा बाय दी बीच हॉटेल येथे ६ नोव्हेंबर २०२० ते १० फेब्रुवारी २०२२२ दरम्यान घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुनाथ कुचिक हे कामगार क्षेत्रात कार्यरत असून शिवसेनेचे उपनेते आहेत़. आरोपीने फिर्यादीसोबत प्रेमसंबंध निर्माण करुन लग्नाचे आमिष दाखवले. फिर्यादीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यातून फिर्यादी गरोदर राहिल्या. तेव्हा त्यांची संमती नसताना जबरदस्तीने गर्भपात करुन तसेच या बद्दल कोणाला काही सांगितले तर तुला मारुन टाकील, अशा धमक्या दिल्या आहेत.

तसेच फियार्दी यांची तब्येत ठीक नसताना फिर्यादीकडून समजूतीचे करारनाम्यावर सह्या करुन घेतली आहे. त्यामुळे कुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

Web Title: shiv sena deputy leader raghunath kuchik charged with rape molested girl