शेरखान शेख यांची सर्पमित्र म्हणून राष्ट्रीय पातळीवर नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 14:43 IST2024-12-19T14:42:36+5:302024-12-19T14:43:04+5:30
शेरखान शेख यांनी साप पकडण्यासाठी छंद म्हणून अर्धा किलो वजनाची चांदीची स्टिक बनवल्याने ते चांगलेच चर्चेत

शेरखान शेख यांची सर्पमित्र म्हणून राष्ट्रीय पातळीवर नोंद
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सर्पमित्र शेरखान शेख यांच्या सह त्यांच्या चांदीच्या स्टिकची आशिया बुक रेकॉड या राष्ट्रीय पातळीवर नोंद झाली आहे. शिक्रापूर ता. शिरुर येथील सर्पमित्र शेरखान शेख यांनी शेकडो सापांना जीवदान देत निर्सगात मुक्त केले.
काही दिवसांपूर्वी शेरखान शेख यांनी साप पकडण्यासाठी छंद म्हणून अर्धा किलो वजनाची चांदीची स्टिक बनवल्याने ते चांगलेच चर्चेत आलेले असताना त्यांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व ओएमजि बुक रेकॉर्ड मध्ये झालेली होती.
शेरखान शेख यांची राष्ट्रीय पातळीवरील आशिया बुक रेकॉड मध्ये शेरखान शेख सह त्यांच्या चांदीच्या स्टिकची नोंद झाली असून त्याबाबतचे प्रमाणपत्र त्यांना प्राप्त झाले आहे.शेरखान शेख यांच्या सह त्यांच्या स्टिकची राष्ट्रीय पातळीवर नोंद झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.