ती बोलेना, दुसऱ्याशी जवळीक वाढल्याचा संशय, तरुणाचा गळफास

By विवेक भुसे | Updated: December 5, 2023 19:21 IST2023-12-05T19:21:02+5:302023-12-05T19:21:18+5:30

एका मुलीबरोबर या मुलाचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते

She doesn't speak suspicion of getting close to someone else hanging the young man | ती बोलेना, दुसऱ्याशी जवळीक वाढल्याचा संशय, तरुणाचा गळफास

ती बोलेना, दुसऱ्याशी जवळीक वाढल्याचा संशय, तरुणाचा गळफास

पुणे: तीन वर्षांपासून प्रेमसंबंध असताना ती त्याच्याशी आता नीट बोलत नव्हती. इतर कोणासोबत तिची जवळीक वाढली असल्याचा त्याला संशय येत होता. त्यातून मानसिक त्रासातून एका १६ वर्षाच्या युवकाने आजीच्या घरी जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एका १६ वर्षाच्या युवतीवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मुंढवा येथे राहणार्या या युवकाच्या आईने येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका १६ वर्षाच्या युवतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार येरवड्यातील लक्ष्मीनगर येथे १ डिसेंबर रोजी घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा १६ वर्षाचा मुलगा शिक्षण घेत होता. त्याचे एका मुलीबरोबर गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून ती मुलगी नीट बोलत नव्हती. तसेच त्याला तुझ्यासोबत बोलायचे नाही, असे वारंवार बोलत होती. तिच्या अशा वागण्याने त्याला मानसिक त्रास होत होता. १ डिसेंबर रोजी हा युवक आजीच्या घरी आला. तिच्यासोबत पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करताना तिच्याशी वाद झाला. त्यानंतर त्याने मानसिक त्रासातून आजीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक जमदाडे तपास करीत आहेत.

Web Title: She doesn't speak suspicion of getting close to someone else hanging the young man