Video : शरद पवारांची प्रकृती सुधारली; शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 14:47 IST2026-02-14T14:45:25+5:302026-02-14T14:47:05+5:30
- आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्या प्रकृतीबाबत समाधान व्यक्त केले आहे.

Video : शरद पवारांची प्रकृती सुधारली; शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) सर्वेसर्वा शरद पवार यांना आज पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथून उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. काही दिवसांपूर्वी खोकल्याच्या त्रासामुळे त्यांना बारामतीहून पुण्यात दाखल करण्यात आले होते. आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्या प्रकृतीबाबत समाधान व्यक्त केले आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार पवार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि चिंतेचे कोणतेही कारण नाही. पुढील काही दिवस घरी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला असून नियमित औषधोपचार सुरू ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तपासण्या समाधानकारक आढळल्याने त्यांना मर्यादित प्रवासास परवानगी देण्यात आल्याचेही रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले
#पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे अध्यक्ष शरद पवार यांना उपचारानंतर आज पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथून डिस्चार्ज देण्यात आला. #SHARADPAWAR#Punepic.twitter.com/Ewg7NIcT7i
— Lokmat (@lokmat) February 14, 2026
दरम्यान, आरोग्य सुधारल्यानंतर पवार लवकरच नियमित राजकीय व संघटनात्मक कामकाजात सक्रिय होतील, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. मात्र, पूर्णपणे ठणठणीत झाल्यानंतरच पुढील दौरे आणि बैठकींचे नियोजन केले जाईल, असे पक्ष सूत्रांनी सांगितले.
समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण
पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची बातमी समजताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत असून अनेकांनी लवकरच सक्रिय राजकारणात परतण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.