Pune Crime: प्रेमाचे जाळे टाकून लैंगिक शोषण; इन्स्टाग्रामवर फोटो केले व्हायरल
By भाग्यश्री गिलडा | Updated: April 20, 2024 15:33 IST2024-04-20T15:32:38+5:302024-04-20T15:33:42+5:30
काळेपडळ परिसरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली...

Pune Crime: प्रेमाचे जाळे टाकून लैंगिक शोषण; इन्स्टाग्रामवर फोटो केले व्हायरल
पुणे : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी शुभम बबन राठोड (वय २०, रा. साईराम कॉलनी, काळेपडळ) याच्याविरोधात वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते ११ एप्रिल २०२४ दरम्यान घडला आहे.
याबाबत काळेपडळ परिसरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली. अधिक माहितीनुसार, आरोपी हा तक्रारदार मुलीच्या मैत्रिणीच्या परिचयाचा आहे. आरोपीने तिच्याशी इन्स्टाग्रामवर ओळख वाढवून जीवाचे बरे-वाईट करण्याची धमकी दिली.
तसेच तिच्यासोबत प्रेमसंबंध करून आईला भेटवतो म्हणून घरी बोलावून घेतले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुलीचा अश्लील फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल केला. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात पोक्सो ॲक्ट तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक इंगळे तपास करत आहेत.