Pune Crime: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार, वाघोली परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 13:00 IST2023-11-09T13:00:18+5:302023-11-09T13:00:39+5:30

याप्रकरणी ३२ वर्षांच्या व्यक्तीवर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे....

Sexual assault on woman by luring her for marriage, incident in Wagholi area | Pune Crime: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार, वाघोली परिसरातील घटना

Pune Crime: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार, वाघोली परिसरातील घटना

वाघोली (पुणे) : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार वाघोली येथील पीडित महिलेच्या घरी जून २०२३ आणि ऑक्टोबर २०२३ ते आजपर्यंत घडला आहे. याप्रकरणी ३२ वर्षांच्या व्यक्तीवर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत ३२ वर्षांच्या महिलेने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अभिजित नरेंद्र चव्हाण (वय ३२, रा. वाघोली) याच्यावर आयपीसी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याचे पहिले लग्न झाल्याचे महिलेपासून लपवून ठेवले. महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. तिने नकार दिला असता शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच तू जर मला सोडून गेली तर तुझी बदनामी करेन, फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याचा पुढील तपास लोणीकंदचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलिस करीत आहेत.

Web Title: Sexual assault on woman by luring her for marriage, incident in Wagholi area