Pune Crime: चुलत्याकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

By नितीश गोवंडे | Published: January 24, 2024 02:08 PM2024-01-24T14:08:57+5:302024-01-24T14:10:40+5:30

स्वारगेट पोलिसांनी सहा जणांविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे....

Sexual assault on minor girl by cousin, case registered against six persons | Pune Crime: चुलत्याकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune Crime: चुलत्याकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

पुणे : तुझ्या अंगावरील तिळ मोजतो असे म्हणत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा चुलत्यानेच लैंगिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच याबाबत घरात सांगितले तर आई आणि तुला मारुन टाकू अशी धमकी देखील पीडित मुलीला दिली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी सहा जणांविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

याप्रकरणी गुलटेकडी परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीने मंगळवारी (दि. २३) स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून चुलता, चुलती व तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर ते डिसेंबर २०२३ दरम्यान आरोपीच्या गुलटेकडी येथील घरात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या चुलतीने मुलीला तिच्या घरी घेऊन गेली. घरात त्या दोघी पत्ते खेळत असताना चुलत्याने व इतर आरोपींनी मुलीच्या अंगाला अश्लील स्पर्श करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यानंतर चुलत्याने मुलीला आतील खोलीत घेऊन गेला. त्याठिकाणी तुझ्या अंगावरील तिळ मोजतो असे म्हणत तिच्यासोबत अश्लील चाळे केले. तसेच याप्रकरणी आईला सांगितले तर आई व तुला मारून टाकण्याची धमकी आरोपीने दिली. यामुळे घाबरलेल्या पीडित तरुणीने याबाबत कुठे वाच्यता केली नाही.
अखेर मुलीने मंगळवारी स्वारगेट पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरुन सहा जणांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दसगुडे करत आहेत.

Web Title: Sexual assault on minor girl by cousin, case registered against six persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.