आळंदीत ज्ञानेश्वरी गुरुकुल संस्थेत २ अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 16:10 IST2025-01-05T16:10:23+5:302025-01-05T16:10:34+5:30

संस्थेत पाहुणा म्हणून आलेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाने संस्थेत शिकत असलेल्या बारा वर्षीय दोन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले

Sexual assault on 2 minors at Dnyaneshwari Gurukul Institute in Alandi | आळंदीत ज्ञानेश्वरी गुरुकुल संस्थेत २ अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार

आळंदीत ज्ञानेश्वरी गुरुकुल संस्थेत २ अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची खळबजनक घटना उघड झाली आहे. विशेष म्हणजे संस्थेत पाहुणा म्हणून आलेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाने संस्थेत शिकत असलेल्या बारा वर्षीय दोन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. शनिवारी (दि. ४) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी महेश नामदेव मिसाळ मामा (वय २८ रा. खोकरमोहा, ता. शिरूरकासार, जि. बीड) व त्याची बहीण ऋतुजा भीमराव दराडे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित बारा वर्षीय मुलाच्या आईने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
            
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी हद्दीतील वडगाव रस्त्याला ज्ञानेश्वरी गुरुकुल संस्था आहे. त्या संस्थेत आरोपी हा पाहुणा म्हणून आलेला होता. शनिवारी मध्यरात्री आरोपी हा पीडित मुलांच्या खोलीत येऊन त्यांच्या शेजारी झोपला. दरम्यान त्याने दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी महेश मिसाळ या आरोपीला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षण भीमा नरके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जात आहे.

Web Title: Sexual assault on 2 minors at Dnyaneshwari Gurukul Institute in Alandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.