गुंगीचे औषध देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 14:24 IST2021-12-07T14:24:10+5:302021-12-07T14:24:24+5:30

तरुणी गर्भवती राहिल्यावर तरुणाने लग्नास नकार दिल्याने तिने पोलिसांकडे धाव घेतली

sexual abuse of a young woman by giving her a narcotic | गुंगीचे औषध देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार

गुंगीचे औषध देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार

पुणे : मित्राने तरुणीच्या घरी येऊन तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल चार दिवस तिच्यावर अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती राहिल्यावर लग्नास नकार दिल्याने या तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी नदीम बाबु शेख (वय ३२, रा. मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मुंढवा येथील केशवनगरमध्ये राहणाऱ्या एका २७ वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीम शेख आणि तरुणी मित्र आहेत. तरुणी या इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत होत्या. लॉकडाऊननंतर त्या घरीच होत्या. शेख हा मुंबईत् खासगी नोकरी करतो. सप्टेंबरमध्ये तो फिर्यादीच्या घरी आला होता. त्याने तरुणीला गुंगीचे औषध दिले. त्यामुळे ती बेशुद्ध झाली असताना तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले.

१० ऑक्टोबर रोजी तो पुन्हा तिच्या घरी आला. तिच्याच घरी राहिला. त्याने १० ते १४ ऑक्टोबर दरम्यान तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती राहिली. हे समजल्यावर त्याने तिला शिवीगाळ करुन लग्न न करण्याची धमकी दिली. तेव्हा तिने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी काटे तपास करीत आहेत.

Web Title: sexual abuse of a young woman by giving her a narcotic