शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

अल्पवयीन दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार; शिक्रापूर येथील संतापजनक प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 2:54 PM

पाबळ (ता. शिरूर) येथे असलेल्या मतिमंद मुलांची निवासी शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग पीडित मुलीला त्रास होऊ लागल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर ती गरोदर असल्याची बाब पुढे आली असून तिच्यावर बलात्कार झाला आहे.

ठळक मुद्देती गरोदर असल्याची बाब पुढे आली असून तिच्यावर बलात्कार झाल्याचा प्रकार उघडभा. दं. वि. कलम ३७६ तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ४ अन्वये गुन्हा दाखल

शिक्रापूर : पाबळ (ता. शिरूर) येथे असलेल्या मतिमंद मुलांची निवासी शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या सतरा वर्षीय दिव्यांग पीडित मुलीला त्रास होऊ लागल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर ती गरोदर असल्याची बाब पुढे आली असून तिच्यावर बलात्कार झाला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व पीडित युवतीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलगी मतिमंद असून तिचे पालक पुण्यामध्ये राहतात. तिच्या पालकांनी तिला पाबळ येथील मतिमंद मुलांच्या निवासी शाळेमध्ये शिक्षणासाठी दाखल केले आहे. पीडित मुलगी आजारी असल्याने तिच्या पालकांनी तिला घरी आणले होते. परंतु तिला बरे वाटत असल्याने पुन्हा २१ डिसेंबर रोजी पाबळ येथे आणून सोडले होते. त्यांनतर २२ तारखेला तिला त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला शिक्षकांनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तिची तपासणी करून ती गरोदर असल्याचे सांगितले. तिच्या पालकांनादेखील याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनतर तिच्या पालकांनी तातडीने पाबळ येथे येत मुलीला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली.पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३७६ तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे हे करत आहेत. 

टॅग्स :Puneपुणे