संतापजनक! पिंपरीत सात वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 19:58 IST2022-06-15T19:58:02+5:302022-06-15T19:58:09+5:30
बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी नराधमावर गुन्हा दाखल

संतापजनक! पिंपरीत सात वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार
पिंपरी : पार्किंगमध्ये सायकल खेळत असलेल्या सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी एकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पिंपरीगाव येथे सोमवारी (दि. १३) रात्री साडेनऊ ते पावणेदहा या वेळेत हा प्रकार घडला.
पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने याप्रकरणी मंगळवारी (दि. १४) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जोएल एलिक हरबर्ट (वय ४२, रा. वैभवनगर, पिंपरी), असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ही राहत्या घराच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये सायकल खेळत होती. त्यावेळी कुत्रे आडवे आल्याने ती शेजारी बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये गेली. त्यावेळी आरोपीने तिला बोलावून बाजूला घेऊन गेला. त्यानंतर अश्लीलकृत्य केले. घरी गेल्यानंतर पीडित मुलीने सर्व काही तिच्या आईला सांगितले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.