शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्यात सात-बारा कोरे

By admin | Updated: July 4, 2015 00:02 IST

औद्योगिकीकरणाच्या टप्पा क्रमांक ३ साठी संपादित करण्यात आलेल्या तालुक्यातील रांजणगाव-गणपती, कारेगाव, करडे व बाभुळसर खुर्द या गावातील ११२०-४५ हेक्टर

शिरूर : औद्योगिकीकरणाच्या टप्पा क्रमांक ३ साठी संपादित करण्यात आलेल्या तालुक्यातील रांजणगाव-गणपती, कारेगाव, करडे व बाभुळसर खुर्द या गावातील ११२०-४५ हेक्टर जमिनींपैकी ८१४ हेक्टर जमिनीवरील औद्योगिकीकरणाचे शेरे काढण्यात आल्याचे प्रांताधिकारी सोनप्पा यमगर व महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अजित देशमुख यांनी संबंधित गावच्या शेतकऱ्यांसमोर जाहीर केले. आठवड्यात शेतकऱ्यांचे सात-बारा कोरे होणार आहेत.मागील पंधरवड्यात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार बाबूराव पाचर्णे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन संबंधित चार गावांतील जमिनीवरील औद्योगिकीकरणाचे शेरे काढण्यासंदर्भात विनंती निवेदन दिले होते. या प्रलंबित प्रश्नाबाबत देसाई यांनी तत्काळ दखल घेऊन त्याच दिवशी अधिसूचनेनुसार स्वाक्षरी केली होती. या प्रक्रियेनंतर प्रांताधिकारी यमगर व एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी देशमुख यांनी आमदार पाचर्णे यांच्या कार्यालयाच्या आवारात आयोजित कार्यक्रमात शेरे काढण्यात आल्याचे जाहीर केले. १७ वर्षांपूर्वी ११२० हेक्टरवर औद्योगिकीकरणाचे शेरे पडले. यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी औद्योगिकीकरणासाठी जमीन संपादनास विरोध दर्शवला. ज्यांनी विरोध दर्शवला नाही अशा शेतकऱ्यांच्या २९२.०७ हेक्टर जमिनीवरील औद्योगिकीकरणाचे शेरे तसेच ठेवण्यात आल्याचे यमगर यांनी सांगितले. गेली १७ वर्षे संबंधित चार गावांतील शेतकऱ्यांनी विविध प्रकारे आंदोलने केली. यमगर व देशमुख या अधिकाऱ्यांचा पाचर्णे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून निर्णयाचे स्वागत केले. (वार्ताहर)