शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
4
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
6
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
7
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
9
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
10
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
11
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
12
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
13
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
14
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
15
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
16
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
17
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
18
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
19
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

तिकीटांसाठी ताटकळत उभे राहण्याच्या त्रासातून ज्येष्ठ नागरिक, अंध व्यक्तींची होणार सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 3:23 PM

एस. टी. बसस्थानकांवर आरक्षित तिकीटांसाठी ताटकळत उभे राहण्याच्या त्रासातून ज्येष्ठ नागरिक व अंध व्यक्तींची सुटका होणार आहे.

ठळक मुद्देलांब पल्ल्याच्या विविध बसेससाठी बसस्थानकांवर आरक्षणाची सुविधाएस. टी.च्या वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी याबाबतचे काढले परिपत्रक

पुणे : एस. टी. बसस्थानकांवर आरक्षित तिकीटांसाठी ताटकळत उभे राहण्याच्या त्रासातून ज्येष्ठ नागरिक व अंध व्यक्तींची सुटका होणार आहे. राज्यातील सर्व बसस्थानकांवर आरक्षण तिकीट खिडकीवर ज्येष्ठ व अंधांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्याचा निर्णय एस. टी. महामंडळाने घेतला आहे. एस. टी.च्या लांब पल्ल्याच्या विविध बसेससाठी बसस्थानकांवर आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच आॅनलाईन माध्यमातूनही आरक्षण करता येते. बसस्थानकांवरील आरक्षण खिडक्यांवर अनेकदा लांबलचक रांग लागते. अशावेळी ज्येष्ठ नागरिक व अंध व्यक्तींना रांगेत त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर एस. टी. प्रशासनाने ज्येष्ठ व अंधांसाठी आरक्षण खिडक्यांवर स्वतंत्र रांग करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत एस. टी.च्या वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी याबाबतचे परिपत्रक काढून सर्व विभाग नियंत्रकांना सूचना दिल्या आहेत.ज्येष्ठ नागरिक व अंधांना आरक्षण खिडकीवर सर्वसाधारण रांगेत न उभे त्यांच्यासाठी निर्माण केलेल्या स्वतंत्र रांगेतून तिकिट देण्यात येईल. तसेच गर्दीच्यावेळी आरक्षण खिडकीवरील कर्मचाऱ्यांनी प्राधान्याने ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगाना तिकिटे द्यावीत विनाकारण त्यांना ताटकळत ठेऊ नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड