रस्ता ओलांडताना बसखाली येऊन ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 18:39 IST2019-12-06T18:38:49+5:302019-12-06T18:39:59+5:30
रस्ता ओलंडताना बसच्या चाकाखाली येऊल ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

रस्ता ओलांडताना बसखाली येऊन ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
पुणे : रस्ता ओलांडताना खासगी बसची धडक लागून बसचे चाक डाेक्यावरुन गेल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील गांजवे चाैकात ही घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी पाेलिसांनी बसचालक दिलीप विठ्ठल चव्हाण याला ताब्यात घेतले आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री आठच्या सुमारास खासगी बस गांजवे चाैक येथील सिग्नलला उभी हाेती. त्यावेळी एक ज्येष्ठ नागरिक बसच्या समाेरुन रस्ता ओलांडत हाेते. सिग्नल सुटल्याने बसचालकाने बस पुढे नेली बसचालकाचाल ज्येष्ठ नागरिक दिसले नाहीत त्यामुळे बसची धडक बसून ज्येष्ठ नागरिक बसच्या चाकाखाली आले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे.
मृत्यूमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. पुढील तपास विश्रामबाग पाेलीस करत आहेत.