शेअरच्या आमिषाने २२ कोटींची ज्येष्ठाची फसवणूक; आणखी चौघे जाळ्यात, ३ कोटी २४ लाखांची रक्कम केली फ्रिज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 10:15 IST2026-02-12T10:15:05+5:302026-02-12T10:15:22+5:30

ज्येष्ठ नागरिकाने पुण्यातील खासगी कंपनी विकल्यानंतर मिळालेली मोठी रक्कम त्यांनी बँकेत ठेवली होती

Senior citizen cheated of Rs 22 crores with the lure of shares; Four more caught in the trap, Rs 3 crore 24 lakhs frozen | शेअरच्या आमिषाने २२ कोटींची ज्येष्ठाची फसवणूक; आणखी चौघे जाळ्यात, ३ कोटी २४ लाखांची रक्कम केली फ्रिज

शेअरच्या आमिषाने २२ कोटींची ज्येष्ठाची फसवणूक; आणखी चौघे जाळ्यात, ३ कोटी २४ लाखांची रक्कम केली फ्रिज

पुणे: शेअर मार्केटमध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २२ कोटी ३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी आणखी चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या आता आठवर पोहोचली असून, पोलिसांनी ३ कोटी २४ लाख रुपयांची रक्कम फ्रिज करण्यात (गोठवण्यात) यश मिळविले आहे, अशी माहिती सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यापूर्वी मुनीलकुमार सुरेंद्र सिंह (५१, रा. अंबरनाथ), आकाश मराठे, लाला उमाप (२६) आणि परमेश्वर दाभाडे (२३, सर्व रा. छत्रपती संभाजीनगर) यांना अटक करण्यात आली होती. त्यांना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून साहिल श्रीसुंदर (२२) आणि विश्वजीत खंदारे (२१, दोघे रा. संभाजीनगर) यांची नावे समोर आली. पुढील तपासात जनधन योजनेतील खात्यांची किट, एटीएम कार्ड, पासबुक, इंटरनेट बँकिंग माहिती अभिजित नाडे (२१) आणि दिशांत कांबळे (२२) यांच्याकडे दिल्याचे निष्पन्न झाले. न्यायालयाने या चौघांना १६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार ज्येष्ठ नागरिक मूळ हरयाणातील असून, पुण्यातील त्यांची खासगी कंपनी विकल्यानंतर मिळालेली मोठी रक्कम त्यांनी बँकेत ठेवली होती. नोव्हेंबर महिन्यात अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधून शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठा नफा मिळेल, असे सांगितले. पाठविलेल्या लिंकच्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी सात वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये २२ कोटी ३ लाख रुपये जमा केले. मात्र, परतावा न मिळाल्याने फसवणूक उघडकीस आली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे.

Web Title : शेयर घोटाले में वरिष्ठ नागरिकों से करोड़ों की ठगी; और गिरफ्तारियां

Web Summary : पुणे पुलिस ने शेयर बाजार घोटाले में एक वरिष्ठ नागरिक को निशाना बनाने वाले चार और लोगों को गिरफ्तार किया, जिससे कुल गिरफ्तारियां आठ हो गईं। पीड़ित को ₹22 करोड़ से अधिक का नुकसान हुआ। पुलिस ने ₹3.24 करोड़ फ्रीज किए, धोखाधड़ी की जांच जारी है।

Web Title : Seniors Duped of Millions in Stock Scam; More Arrests

Web Summary : Pune police arrested four more in a stock market scam targeting a senior citizen, totaling eight arrests. The victim lost over ₹22 crore. Police have frozen ₹3.24 crore, continuing the investigation into the fraud.