ज्येष्ठ पुराजीवशास्त्रज्ञ डॉ. रमेश बडवे यांचे निधन*

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:17 IST2021-02-05T05:17:08+5:302021-02-05T05:17:08+5:30

भूशास्त्रात एम.एस्सी प्राप्त केल्यावर काही काळ त्यांनी कोकणातील बॉक्साइट्च्या खाणींवर सल्लागार म्हणून काम केले. १९७३ मध्ये पुण्यातील आघारकर संशोधन ...

Senior archaeologist Dr. Ramesh Badve passes away * | ज्येष्ठ पुराजीवशास्त्रज्ञ डॉ. रमेश बडवे यांचे निधन*

ज्येष्ठ पुराजीवशास्त्रज्ञ डॉ. रमेश बडवे यांचे निधन*

भूशास्त्रात एम.एस्सी प्राप्त केल्यावर काही काळ त्यांनी कोकणातील बॉक्साइट्च्या खाणींवर सल्लागार म्हणून काम केले. १९७३ मध्ये पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेत त्यांनी प्रा. गं. वा. चिपळूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मध्य प्रदेशातील बाघ प्रस्तरांमधील जीवाश्म’ या विषयावर संशोधन करून डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. त्या नंतर याच संस्थेत त्यांनी १९९७ पर्यंत भूशास्त्र व पुराजीवशास्त्राचे विभाग प्रमुख म्हणून काम केले. त्यांच्या कारकीर्दित आघारकर संस्थेतील हा विभाग दक्षिण भारतातील पुराजीवशास्त्राचे महत्वाचे केंद्र म्हणून नावारूपास आला. त्यांना रॉयल सोसायटीच्या फेलोशिपखाली ब्रिटिश नॅचरल हिस्टरी म्युझियम मध्येही काम करायची सुवर्णसंधी मिळाली होती.

डॉ. बडवे यांनी सहा विद्यार्थाना डॉक्टरेटकिरता मार्गदर्शन केले होते. त्यांनी मध्य प्रदेशातील बाघ प्रस्तर, तसेच दक्षिण भारत, कच्छ व अंदमान येथील जीवाश्मांवरील संशोधनात महत्वाचे योगदान दिले आहे.महाराष्ट्रातील लोणार सरोवरावरही त्यांचे काम आहे. डॉ.बडवे यांच्या शिंपल्यांचे जीवाश्म व जैवलेशावशेषांवरील कामाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर नियकालिकांमध्ये घेण्यात आली आहे. त्यांच्याकडे अनेकजण भूजल,खाणकाम,भूस्खलन या बाबतीत सल्ला घेण्यास येत असत.

डॉ. बडवे अत्यंत उमद्या व्यक्तिमत्वाचे, हसतमुख,आणि त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला, व्यक्तीला कामासाठी सतत प्रेरणा व प्रोत्साहन देणारे ऊर्जा स्रोत होते. शेवट्पर्यंत ते कार्यरत होते.

Web Title: Senior archaeologist Dr. Ramesh Badve passes away *