परदेशातून गिफ्ट पाठवतो...! महिलेला १४ लाखांचा गंडा

By भाग्यश्री गिलडा | Published: December 21, 2023 05:50 PM2023-12-21T17:50:22+5:302023-12-21T17:50:56+5:30

महिलेला सोशल मीडियावरील ओळख महागात पडली

Sending gifts from abroad 14 lakhs to the woman | परदेशातून गिफ्ट पाठवतो...! महिलेला १४ लाखांचा गंडा

परदेशातून गिफ्ट पाठवतो...! महिलेला १४ लाखांचा गंडा

पुणे: सोशल मीडियावर ओळख वाढवून परदेशातून गिफ्ट पाठवले असल्याचे सांगून एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार आंबेगाव पठार परिसरात घडला आहे. याबाबत एका ३३ वर्षीय महिलेने बुधवारी (दि. २०) पोलिसांना फिर्याद दिली आहे. 

फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे हा प्रकार १९ ऑक्टोबर २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ यादरम्यान घडला आहे. तक्रारदार महिलेची पायलट रोहन नावाच्या व्यक्तीसोबत सोशल मीडियावर ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यावर पिळत रोहनने महिलेचा नंबर मागितला. त्यानंतर दोघांमध्ये रोज संभाषण होऊन मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही कालांतराने तक्रारदार महिलेसाठी महागडे वस्तू गिफ्ट म्हणून पाठवत असल्याचे सांगितले. त्यांनतर डिलिव्हरी एजंटचा नंबर देऊन महिलेला क्लिअरन्स फी, कस्टम चार्जेस, लोकल फ्लाईट तसेच हॉटेल बिल अशी वेगवेगळी कारणे सांगून महिलेकडून एकूण १४ लाख १३ हजार रुपये उकळले. महिलेला संशय आल्याने यासंदर्भात विचारपूस केली असता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनतर तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत झालेल्या प्रकारचा जबाब नोंदवला. याप्रकरणी पायलट रोहन याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर पुढील तपास करत आहेत.

Web Title: Sending gifts from abroad 14 lakhs to the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.