शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान सहन करून कांदा बाजारात विक्री

By admin | Updated: July 9, 2015 02:03 IST

कांद्याचे बाजारभाव काहीसे कमी झाले असले, तरी बराखीतील कांदा शेतकरी विक्रीसाठी बाहेर काढू लागला आहे. शेतात असताना कांद्याला पावसाचा तडाखा बसला होता.

मंचर : कांद्याचे बाजारभाव काहीसे कमी झाले असले, तरी बराखीतील कांदा शेतकरी विक्रीसाठी बाहेर काढू लागला आहे. शेतात असताना कांद्याला पावसाचा तडाखा बसला होता. त्यामुळे सड होण्याचे प्रमाण जास्त असल्याने शेतकऱ्यांपुढे कोणताही पर्याय नाही. शेतकऱ्यांना सध्या मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे. मागील वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ होते. या वर्षी मात्र परिस्थिती वेगळी आहे. कांदा लागवडीसाठी महागड्या दराने रोप व बी खरेदी करावे लागले. नंतर बनावट बियाण्यामुळे डेंगळे तयार झाले. कांदापीक जोमात आल्यानंतर दोन वेळा अवकाळी पावसाचा तडाखा बसला. वातावरणातील बदलाचा फटकासुद्धा पिकावर झाला. या वर्षी शेतकऱ्यांच्या भांडवलात वाढ झाली आहे. कांदा काढणीनंतर पावसाचा व्यत्यय आला होता. अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची शेतातूनच विक्री केली, तर काहींनी तो बराखीत साठवून ठेवला होता. डेंगळे कांदे मातीमोल भावाने विकले गेले. शेतात असताना पावसाने कांदा भिजला; परिणामी काढणी करतानाच कांदा सडू लागला होता. बराखीत साठवणूक करताच कांद्याची सड होऊ लागली. अनेक शेतकऱ्यांचा कांदा मोठ्या प्रमाणात सडला. मध्यंतरी १० किलोस २५० रुपयांपर्यंत बाजारभाव गेला होता. बाजारभाव कमी होऊनही शेतकरी बराखीत कांदा विक्रीसाठी आणत आहे. बराखीत सडलेला कांदा मोठ्या प्रमाणावर निघत आहे. तो अक्षरश: फेकून द्यावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची माहिती माजी उपसरपंच जगदीश अभंग यांनी दिली.