खोरच्या सागर चौधरीची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:12 IST2021-09-26T04:12:21+5:302021-09-26T04:12:21+5:30

हडपसर येथे झालेल्या मास्टर गेम्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात येणारी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा या वर्षी हडपसर या ...

Selection of Sagar Chaudhary of Khor for state level competition | खोरच्या सागर चौधरीची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

खोरच्या सागर चौधरीची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

हडपसर येथे झालेल्या मास्टर गेम्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात येणारी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा या वर्षी हडपसर या ठिकाणी पार पडली. यामध्ये खोर (ता. दौंड) येथील सागर चौधरी हा खेळाडू १०० मीटर धावणे व भालाफेक या क्रीडा प्रकारामध्ये रौप्यपदकांचा मानकरी ठरला आहे. यापुढे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी म्हाळुंगे या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय मास्टर गेम्स स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे.

सागर चौधरी याने आजपर्यंत अनेक ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून घवघवीत यश संपादन केले असून, तो अनेक खेळाडूंना मार्गदर्शन देखील करीत असतो. खोरसारख्या दुर्गम डोंगराळ भागातील या खेळाडूची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्याने खोर ग्रामस्थांनी सागरचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Selection of Sagar Chaudhary of Khor for state level competition