शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

पुण्यात रंगणार ‘लोकमत महामॅरेथॉन’चे दुसरे पर्व !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 12:17 PM

मागील वर्षी पुण्यात झालेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या पहिल्या पर्वाला लाभला होता अभूतपूर्व प्रतिसाद

ठळक मुद्दे१६ फेब्रुवारीला शर्यत : नावनोंदणीला प्रारंभ, व्हीटीपी रिअ‍ॅल्टी प्रस्तुत किंग्ज ऑटोरायडर्स, सीएम इंटरनॅशनल स्कूल यांच्या सहकार्याने आयोजनयेत्या १६ फेब्रुवारीला म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातून या शर्यतीला प्रारंभ होणार

पुणे : देशातील मॅरेथॉन शर्यतीची जननी असलेल्या पुण्यनगरीतील नागरिकांच्या हृदयात स्थान निर्माण केलेल्या व्हीटीपी रिअ‍ॅल्टी प्रस्तुत किंग्ज ऑटोरायडर्स आणि सीएम इंटरनॅशनल स्कूल, बालेवाडी यांच्या सहकार्याने आयोजित ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वाचा थरार शहरात रंगणार आहे. येत्या १६ फेब्रुवारीला म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातून या शर्यतीला प्रारंभ होणार आहे.मागील वर्षी पुण्यात झालेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या पहिल्या पर्वाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.   त्यात सर्व वयोगटांतील फिटनेसप्रेमी, व्यावसायिक तसेच हौशी धावपटू, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, आयटीयन्स, विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. आकर्षक बक्षिसे, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, अचूक नियोजन या वैशिष्ट्यांमुळे पहिल्या वर्षी ही शर्यत चोखंदळ अशी वैश्विक ओळख असलेल्या पुणेकरांच्या पसंतीस उतरली. यामुळे साहजिकच ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसºया पर्वाबाबत पुण्यात सर्वत्र उत्सुकता होती. त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. शर्यतीच्या दुसºया पर्वाच्या  नाव नोंदणीला प्रारंभ झाला असून, प्रारंभीच पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर आपला प्रवेश निश्चित केला आहे. नावनोंदणीची अंतिम मुदत ३१ जानेवारीपर्यंत आहे. ३ किलोमीटरची फॅमिली रन आणि ५ किलोमीटर फन रन (१२ वर्षांपेक्षा जास्त, धावण्याचा छंद असणाºयांसाठी) १० किलोमीटरची पॉवर रन (१६ पेक्षा जास्त वर्षांवरील) आणि २१ किलोमीटर (१८ वर्षांपुढील) अशा गटांमध्ये ही शर्यत रंगणार आहे.  त्याचप्रमाणे लष्कर आणि पोलीस दलातील धावपटूंसाठी ‘डिफेन्स’ हा २१ किलोमीटर अंतराचा वेगळा गट ठेवण्यात आला आहे. विविध गटांमधील विजेत्यांना एकूण सहा लाख रुपयांपर्यंत बक्षिसे दिली जाणार आहेत.  ३ आणि ५ किलोमीटर अंतराच्या गटामध्ये नावनोंदणी करणाºयांना टी-शर्ट, गुडी बॅग, सहभागाचे पदक आणि ब्रेकफास्ट देण्यात येईल. १० तसेच २१ किलोमीटर गटात नोंदणी करणाºया सर्व धावपटूंना टी शर्ट, गुडी बॅग, सर्टिफिकेट, ब्रेकफास्ट यांसह टायमिंग चिप उपलब्ध करून देण्यात येईल. या गटातील शर्यत पूर्ण करणाºयांना मेडल देण्यात येईल. १० तसेच २१ किलोमीटर शर्यतीच्या पुरुष आणि महिला गटातील तसेच डिफेन्स गटातील पहिल्या ३ क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील.धावणे हा आदर्श व्यायामप्रकार आहे. त्यामुळे लघू, मध्यम वा लांब पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यतीत सहभागी होण्याचा अनुभव आरोग्यदायी, आनंददायक असतो. गेल्या काही वर्षांपासून पुणेकर आरोग्याबाबत कमालीचे जागरूक झाले आहेत. पहाटे, सायंकाळी वेळ मिळेल तेव्हा पुणेकर तंदुरुस्ती कायम राखण्यासाठी घाम गाळताना दिसतात. यापैकी बहुतेक जण धावणे या व्यायाम प्रकाराला प्राधान्य देताना दिसतात. पुण्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर रनर्स ग्रुप तयार झाले असून, ते इतरांनाही धावण्यासाठी प्रोत्साहित  करीत आहेत. या रनर्स ग्रुपनी मागील वर्षीच्या शर्यतीला भरभरून प्रतिसाद दिला होता. या शर्यतीच्या दुसºया पर्वात स्वत: धावण्यास आणि अनेक पुणेकरांना प्रोत्साहन देण्यात ते उत्सुक आहेत. ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या निमित्ताने अनेकांनी मागील वर्षी धावण्याच्या मोहिमेचा श्रीगणेशा केला. तेदेखील फिटनेसच्या या महोत्सवात सहभागी होणार आहेत..............येथे करा नावनोंदणी...मागील वर्षी १७ फेब्रुवारीला ‘लोकमत महामॅरेथॉन’चे पहिले पर्व पुण्यात झाले. चोखंदळ पुणेकरांनी या उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिला. त्याच वेळी सर्व वयोगटांतील फिटनेसप्रेमी, व्यावसायिक तसेच हौशी धावपटू यांनी आम्ही दरवर्षी या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची ग्वाही दिली होती. दुसºया पर्वासाठी नावनोंदणी सुरू होताच पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात आपला प्रवेश निश्चित केला आहे. ......

‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभागासाठी www.mahamarathon.com/pune या वेबसाइटवर; लोकमत शहर कार्यालय, व्हीया वेंटेज, पहिला मजला, लॉ कॉलेज रोड, एरंडवणे येथे तसेच मयूर टण्णू (८८०५००९३६९) आणि रोहन भोसले (९६०४६४४४९४) यांच्याशी सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत संपर्क साधावा.

टॅग्स :PuneपुणेMarathonमॅरेथॉनLokmat Eventलोकमत इव्हेंटpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड