शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या खटल्यातही १0 वर्षे सक्तमजुरी

By admin | Updated: September 29, 2016 05:55 IST

जुन्नर तालुक्यातील अणे येथील भाऊसाहेब बोरा अपंगकल्याण केंद्रातील गाजलेल्या बलात्कार प्रकरणातील दुसऱ्या खटल्याचाही बुधवारी निकाल लागला. या खटल्यात

राजगुरुनगर : जुन्नर तालुक्यातील अणे येथील भाऊसाहेब बोरा अपंगकल्याण केंद्रातील गाजलेल्या बलात्कार प्रकरणातील दुसऱ्या खटल्याचाही बुधवारी निकाल लागला. या खटल्यात सातवीतील अपंग मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार करणारा आरोपी, महादेव आसराजी बोऱ्हाडे (वय ५४, मूळ रा. बालम टाकळी, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) याला राजगुरुनगरचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. या बलात्कार प्रकरणातील एका अपंग मुलीसंदर्भातल्या खटल्याचा निकाल कालच लागला होता आणि याच आरोपीला न्यायाधीशांनी जन्मठेप सुनावली होती. एकूण ३ मुलींच्या तक्रारीवरून ३ खटले चालू होते. आता २ खटल्यांचा निकाल लागला असून उर्वरित एका खटल्याचा निकाल शुक्रवारी लागेल. याबाबतची हकीकत अशी, अणे येथील भाऊसाहेब बोरा अपंगकल्याण केंद्रात अनेक अपंग विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. आरोपी महादेव बोऱ्हाडे हा या केंद्रात शिपाई म्हणून कामाला होता. त्याने पाचवीतील एका अपंग मुलीवर आधी बलात्कार केला होता. त्याच पद्धतीने त्याने या सातवीत शिकणाऱ्या मुलीला ५ फेब्रुवारी २०१३ रोजी १२ वाजता ती वर्गात असताना तुझ्याकडे काम आहे, असे खोटे सांगून धान्य ठेवण्याच्या कोठीत नेले. तेथे दमबाजी करून तिच्यावर बलात्कार केला. तसेच, ही गोष्ट कोणाला सांगितल्यास जिवे मारीन, अशी धमकीदेखील दिली. दुर्दैव म्हणजे, ही पीडित मुलगी ८० टक्के अपंग आहे. त्या दिवशी त्या केंद्रातील बहुतांश शिक्षक आणि कर्मचारी सहलीला गेले होते. त्यामुळे मुलीने दोन दिवस ही गोष्ट कोणाला सांगितली नाही. दोन दिवसांनी तिने ही गोष्ट ‘केअरटेकर’ मावशीला सांगितली. त्यांनी ही बाब वरिष्ठांना सांगितल्यावर पीडित मुलीला दवाखान्यात नेऊन तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर पीडित मुलीने नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून तत्कालीन पोलीस निरीक्षक एन. एम. सारंगकर यांनी तपास केला आणि आरोपी बोऱ्हाडे याच्यासह संस्थाचालक, शिक्षक मिळून ७ जणांवर गुन्हा दाखल केला होता. राजगुरुनगरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला चालू होता. सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. अरुण ढमाले यांनी काम पहिले. (वार्ताहर)उर्वरित आरोपी दोषमुक्तया खटल्यात सहआरोपी असलेले शिक्षक सावळेराम सीताराम पाचारणे आणि लेखापाल हिरालाल गोकुळदास बाबेल यांना न्यायालयाने दोषमुक्त केले. एक आरोपी वसंत गिते यांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणातील उर्वरित आरोपींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि त्यांना उच्च न्यायालयाने दोषमुक्त केले होते.सर्व शिक्षा एकाच वेळी भोगावी लागेलआरोपीला बलात्काराच्या आरोपाखाली भा.दं.वि. कलम ३७६नुसार १० वर्षे सक्तमजुरी व ३ हजार रुपये दंड आणि तो न भरल्यास ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल कलम ५०६नुसार २ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड आणि तो न भरल्यास २ महिने शिक्षा सुनावली. आरोपीला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलम ४ व ६नुसार १०-१० वर्षे सक्तमजुरी व २ हजार रुपये दंड आणि तो न भरल्यास ६ महिने कारावास; तसेच या कायद्याच्या कलम ८ नुसार ३ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड आणि तो न भरल्यास २ महिने कारावास, कलम १० नुसार ५ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड आणि तो न भरल्यास २ महिने कारावास, अशीही शिक्षा सुनावली. या सर्व शिक्षा आरोपीला एकाच वेळी भोगायच्या आहेत, असे न्यायालयाने निकालात नमूद केले. तसेच, दंडाची रक्कम मुलीला देण्यात येईल, असे निकालात सांगितले.