किंचाळणे बाईचा नाद आहे, तिच्या स्वभावाला औषध नाही, अंधारेंची चित्रा वाघ यांच्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 12:38 IST2025-03-21T12:36:34+5:302025-03-21T12:38:17+5:30
वाघ बाई बद्दल बोलताना झोपडपट्टी बद्दल बोलू नये, कारण झोपडपट्टीला सुद्धा क्लास असतो

किंचाळणे बाईचा नाद आहे, तिच्या स्वभावाला औषध नाही, अंधारेंची चित्रा वाघ यांच्यावर टीका
पुणे : 'तुमच्यासारखे ५६ पायाला बांधून फिरते चित्रा वाघ. समजलं काय', असे विधान आमदार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत बोलताना केले. त्यानंतर विरोधकांडून वाघ यांचा समाचार घेतला जात आहे. वाघ बाई बद्दल बोलताना झोपडपट्टी बद्दल बोलू नये. कारण झोपडपट्टीला सुद्धा क्लास असतो असं म्हणत विधान परिषदेतील त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अंधारे म्हणाल्या, कालचा थयथयाट सभागृहाचा अपमान करणारा होता. सभागृहाची सुसंस्कृत परंपरा गरिमा धाब्यावर बसवत एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या ५६ जण पायाला बांधून फिरते. ही भाषा कोणत्या शाळा कॉलेजात शिकवली जाते हे माहीत नाही. एखाद्याच्या लेकराच्या दुःखाला आपलं राजकीय भांडवल करणारे भाजप नीच आहे. किंचाळणे बाईचा नाद आहे, तिच्या स्वभावाला औषध नाही. वाघ बाई बद्दल बोलताना झोपडपट्टी बद्दल बोलू नये. कारण झोपडपट्टीला सुद्धा क्लास असतो. भाजप बायकाच्या आडून नथीतुन तिर मारण्याचा प्रयत्न करत आहेत. या बाई कधीकाळी उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्या होत्या. वाघ बाई स्वतःच्या राजकीय करिअर साठी पूजा चव्हाण सारख्या भटक्या जातीतील पोरीचं भांडवल करत होत्या. तुम्ही भटक्या जातीतील एका नेत्याचं राजकीय जीवन उध्वस्त करत आहात असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
त्यांना 2-3 कोटीची रक्कमच जरा सुटेबल
वाघ बाई यांनी काल जी भाषा वापरली त्यावर मी जाणार नाही. कारण माझ्यावर संस्कार आहेत. मी परब साहेब यांचे धन्यवाद मानता त्यांनी आकडा काढला. वाघ बाई यांनी जो आकडा काढला तो त्यांच्या कार्यकर्तृत्व पाहता खूप कमी आहे. भाजप जर सत्याची असेल तर त्यांनी संजय राठोड यांची केस ओपन करावी. त्यांच्या नवऱ्याने ज्यावेळेस 1 लाख लाच घेण्याचे आरोप केले. त्यावेळेस त्या उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रवेशासाठी आल्या होत्या. त्यात त्यांना आपल्या नवऱ्याने 1 लाख लाच मागितली याचा संताप होतो. कारण त्यांच्यासाठी 1 लाख खूप कमी आहे. त्यात 2-3 कोटीची रक्कम असते तर जरा सुटेबल वाटली असते अशीही टीका अंधारे यांनी यावेळी केली आहे.