शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कार निवडीसाठी शास्त्रशुद्ध पद्धत

By admin | Updated: March 15, 2015 00:33 IST

क्रीडा क्षेत्रातील शिवछत्रपती पुरस्कारासाठी पुरस्कारार्थींची निवड मंत्र्यांनी करणे योग्य नाही तर पुरस्कारार्थींची निवड क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींच्या समितीने करावी.

पुणे : क्रीडा क्षेत्रातील शिवछत्रपती पुरस्कारासाठी पुरस्कारार्थींची निवड मंत्र्यांनी करणे योग्य नाही तर पुरस्कारार्थींची निवड क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींच्या समितीने करावी. या निवडीसाठी राज्य सरकार लवकरच शास्त्रशुद्ध पद्धत निर्माण करणार आहे. तसेच बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या देखभालीसाठी वार्षिक १२ कोटी रूपयांची तरतूद करण्यात येईल व या द्वारे अनेक क्रीडा स्पर्धा घेण्यात येऊ शकेल, असे वक्तव्य शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी केले.सिंबायोसिस स्पोर्टस सेंटरतर्फे क्रीडाभूषण पुरस्कारवितरणाचे आयोजन करण्यात आले होते. तावडे यांच्या हस्ते लक्ष्य फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल चोरडिया यांना ‘क्रीडाभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. ज्येष्ठ अस्थिशल्यविशारद डॉ. के. एच. संचेती, सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, उपाध्यक्ष डॉ. अरविंद संगमनेरकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, स्पोर्टस् सेंटरचे मानद संचालक सतीश ठिगळे आदी उपस्थित होते.तावडे म्हणाले, ‘शिवछत्रपती पुरस्कारार्थींची निवड क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींची समितीने करावी. खेळाडूचे योगदान, विविध स्पर्धांमधील कामगिरी यावरून गुण देऊन त्या आधारे पुरस्कारार्थींची निवड करावी. यासाठी शास्त्रशुद्ध पद्धत निर्माण करण्यात येईल. बालेवाडी क्रीडा संकुलासाठी दरवर्षी तब्बल १२ कोटी रुपये देखभाल खर्च लागतो. हा खर्च उभा करण्यासाठी तेथे लग्नसोहळ्यांसह काही कार्यक्रम घेण्यात येतात. परंतु, आता अर्थसंकल्पातच दरवर्षी या संकुलाच्या देखभालीसाठी १२ कोटी रूपयांची तरतूद करण्यात येणार आहे. ज्याचा उपयोग क्रीडा स्पर्धांसाठीच होईल.चोरडिया म्हणाले, ‘मी स्वत: राष्ट्रीय स्तरावर टेनिस चॅम्पियन होतो. परंतु, आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ शकलो नाही. त्यामुळेच सुप्तावस्थेतील गुणवंत खेळाडू हेरून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाण्यासाठी पूर्ण मदत करण्याच्या हेतूने लक्ष्य फाउंडेशनच्यामार्फत काम करत आहे.’तावडे यांनी साधला उपस्थितांशी संवाद४विविध खात्यांचा मंत्री असल्याने दिवसभरात अनेक कार्यक्रम भाषणे करावी लागतात. परंतु, कार्यक्रमांमुळे इच्छा असूनही थेट संवाद साधता येत नाही, अशी खंत विनोद तावडे यांनी व्यक्त केली. छोटेखानी भाषणानंतर स्टेजवरून खाली येत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत काही प्रश्नांची उत्तरे दिली.