शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्येही तक्रार निवारण समिती

By admin | Updated: October 16, 2015 01:30 IST

शाळेतील विविध प्रकारच्या तक्रारींसाठी शालेय स्तरावर तक्रार समिती नेमण्यासंबंधी केंद्र्र शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यात नव्याने तरतूद करण्यात आली आहे

पुणे : शाळेतील विविध प्रकारच्या तक्रारींसाठी शालेय स्तरावर तक्रार समिती नेमण्यासंबंधी केंद्र्र शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यात नव्याने तरतूद करण्यात आली आहे. मनुष्य आणि विकास मंत्रालयाकडून ही नवी अधिसूचना २८ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिला शिक्षकांच्या लैगिंक छळासंबंधीच्या तक्रारी प्रामुख्याने सोडविण्यास या समितीने प्राधान्यक्रम देण्यास सुचविले आहे.या अधिसूचनेनुसार, प्रत्येक शाळास्तरावर शिक्षकांसाठी एक तक्रार निवारण समिती असेल. शाळा व्यवस्थापकीय स्तरावर ही समिती काम पाहील. त्यानंतर विभागीय स्तरावर आणि त्यानंतर जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावर समिती नेमण्याबाबत सूचना आहेत. प्रथमत: शाळेतील शिक्षिकेला काहीही अडचण, समस्या किंवा लैगिंक छळासंदर्भात तक्रार असल्यास शाळा व्यवस्थापकीय स्तरावर तक्रार मांडण्यास सांगितले आहे. या स्तरावर १५ दिवसांच्या आत तक्रार करून ती सोडवण्याची सूचना आहे. या स्तरावर तक्रारीचे निवारण न झाल्यास ती सोडविण्यासाठी विभागीय स्तरावरील निवारण समिती काम पाहील. त्यासाठी ३० दिवसांची मुदत असेल. तरीही, शिक्षिकेचे समाधान न झाल्यास ती जिल्हास्तरीय समितीकडे जाऊ शकते. त्यामध्ये ९० दिवस कालावधी असून ही समिती शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण मंडळातील शिक्षण अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काम करेल. राज्य स्तरावरील समिती ही प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात येणार आहे. येथे केलेल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी राहणार आहे. अधिसूचनेनुसार, राज्यस्तरावरील समितीत शिक्षण सचिवांकडून दोन सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या समितीची बैठक दर सहा महिन्यांतून एकदा होणे आवश्यक असेल.