Pune | चिखलीत शाळकरी मुलाच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 14:28 IST2022-11-25T14:27:39+5:302022-11-25T14:28:28+5:30

ही हृदयद्रावक घटना चिखली येथील केएसबी चौक ते चिखली रस्त्यावर घडली...

schoolboy died on the spot after the wheel of a truck ran over him in the mud | Pune | चिखलीत शाळकरी मुलाच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने जागीच मृत्यू

Pune | चिखलीत शाळकरी मुलाच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने जागीच मृत्यू

चिखली (पुणे) : शाळेत चाललेल्या मुलाला व त्याच्या आईला पाठीमागून आलेल्या कारने धडक दिली. यात मुलगा खाली पडल्यानंतर ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना चिखली येथील केएसबी चौक ते चिखली रस्त्यावर गुरुवारी (दि. २४) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

अथर्व आळणे (वय ११, रा. साहिल रेसिडेन्सी से. क्र. ९, मोशी) असे मृत मुलाचे नाव आहे, तर आई हर्षदा आळणे या गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, चिखली येथील केएसबी चौक ते चिखली रस्त्यावर गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शाहूनगर बसथांब्यालगत पाठीमागून आलेल्या कारने दुचाकी (एमएच १४ ईडब्ल्यू ५९५५)ला मागून धडक दिली.

या धडकेनंतर दुचाकीवरील मुलगा खाली पडला. यात मुलगा खाली पडल्यानंतर ट्रक (जी जे ०३ डब्ल्यू ८०१०)चे चाक अंगावरून गेल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला, तर या अपघातात आई हर्षदा आळणे या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अथर्व आळणे हा प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकत होता. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. संबंधित विभागाचे अधिकारी, पोलिस, सामाजीक कार्यकर्ते व नागरिकांची रांग लागली होती.

Web Title: schoolboy died on the spot after the wheel of a truck ran over him in the mud