शाळेतील भांडणाचा राग; दहावीत शिकणाऱ्या मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार, कोथरूड भागातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 17:14 IST2026-01-19T17:12:44+5:302026-01-19T17:14:02+5:30

शाळेत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी एकाला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली, तसेच त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले

School fight rages; A boy studying in class 10 was attacked with a sharp weapon, a shocking incident in Kothrud area | शाळेतील भांडणाचा राग; दहावीत शिकणाऱ्या मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार, कोथरूड भागातील धक्कादायक घटना

शाळेतील भांडणाचा राग; दहावीत शिकणाऱ्या मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार, कोथरूड भागातील धक्कादायक घटना

पुणे : कोथरुड भागात दहावीतील एका मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. शाळेत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून हा प्रकार घडला. या प्रकरणी दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बलराम हनुमंत लोखंडे (वय २४, रा. पांडुरंग काॅलनी, सुतारदरा, कोथरूड) याने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोखंडे याचा लहान भाऊ हा दहावीमध्ये आहे. तो दि. १७ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कोथरूड परिसरातून निघाला होता. स्वामी समर्थ मठाजवळ दोघांनी त्याला अडवले. शाळेत झालेल्या भांडणातून दोघांनी त्याला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पोलिस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

Web Title : कोथरूड: स्कूल में झगड़े के बाद दसवीं के छात्र पर तीक्ष्ण हथियार से हमला

Web Summary : पुणे के कोथरूड में स्कूल में हुए झगड़े के बाद दसवीं कक्षा के एक छात्र पर धारदार हथियार से हमला किया गया। दो लोगों पर आरोप लगे हैं। घटना स्वामी समर्थ मठ के पास हुई; पुलिस जांच कर रही है और संदिग्धों की तलाश जारी है।

Web Title : Kothrud: Tenth-grader Attacked with Sharp Weapon over School Fight

Web Summary : A tenth-grade student in Kothrud, Pune, was attacked with a sharp weapon following a school fight. Two individuals have been charged. The incident occurred near Swami Samarth Math; police are investigating and searching for the suspects.