स्कूल बस चालकाने टेम्पोची काच फोडत धमकी दिली; पुणे पोलिसांनी काही तासातच त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 12:23 IST2025-10-12T12:04:44+5:302025-10-12T12:23:45+5:30
Pune News : पुण्यातील हडपसर परिसरातील एका स्कूलबस चालकाची आणि टेम्पो चालकाचा वाद झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये बस चालकाने टेम्पोची काच फोडल्याचे दिसत असून त्याने टेम्पो चालकाला धमकीही दिल्याचे दिसत आहे.

स्कूल बस चालकाने टेम्पोची काच फोडत धमकी दिली; पुणे पोलिसांनी काही तासातच त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले
Pune News : पुण्यातील हडपसर परिसरात काल एका बस चालकाची आणि टेम्पो चालकाच्या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक बस चालक टेम्पो चालकाला शिव्या देत टेम्पोच्या काच फोडल्याचे दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर काल दिवसभरातून व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये तो चालक टेम्पो चालकाला धमकावत असल्याचे दिसत आहे, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेची पुणे पोलिसांनी काही तासातच दखल घेतली.
थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
काही तासातच पुणे पोलिसांनी व्हिडीओची दखल घेतली. त्या बस चालकाने ज्या ठिकाणी तोडफोड केली होती त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले. हा व्हिडीओ पुणे पोलिसांनी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बस चालकाचे नाव सुरज गणेश पाटील असे आहे. त्याला हडपर पोलिसांनी अटक केली. पुणे पोलिसांनी त्या टेम्पोची तोडफोड झाली त्या ठिकाणी सुरज पाटील याला घेऊन गुडघ्यावर बसवून चालवले. यावेळी त्याने माफी मागितली. यावेळी सुरज पाटील "काल माझ्याकडून चूक झाली, माझ्या हातून गाडी फुटली. यानंतर अशी चूक माझ्याकडून होणार नाही", असे म्हणत त्याने माफीही माागितली आहे. पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
हडपसर परिसरात रस्त्यावर किरकोळ कारणावरुन बस चालक आणि टेम्पो चालकामध्ये वाद सुरू झाला. या वादात बस चालकाने टेम्पोची काच फोडली. या वादाचा एकाने व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर बस चालकावर कारवाई करण्याची मागणी सुरू झाली होती. यावर पुणे पोलिसांनी काही तासातच कारवाई केली.