शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक-विद्यार्थ्यांच्या दांड्यांमुळे वाजली नाही शाळेची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शिक्षकांच्या आरटी-पीसीआर चाचण्या अपूर्ण राहणे, शाळांच्या तपासणी न होणे यामुळे बहुतेक खासगी शाळांची घंटा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शिक्षकांच्या आरटी-पीसीआर चाचण्या अपूर्ण राहणे, शाळांच्या तपासणी न होणे यामुळे बहुतेक खासगी शाळांची घंटा सोमवारी (दि. ४) वाजलीच नाही. महानगरपालिकेच्या निम्म्या शाळा वगळता इतर शाळा बंदच ठेवण्यात आल्या. पुढील एक ते दोन दिवसांत शिक्षकांच्या चाचण्या पुर्ण होतील, त्यानुसार शाळा सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले.

शहरातील इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यास महापालिका प्रशासनाने मान्यता दिली आहे. त्यापुर्वी शाळांमध्ये सर्व शिक्षकांना आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. तसेच विद्यार्थ्यांची बैठकव्यवस्था, स्वच्छता आणि आवश्यक सुचनाफलक आदी तयारी शाळांना करण्यास सांगितली आहे. आतापर्यंत दोन वेळा शाळा सुरू होण्याची तारीख जाहीर करूनही त्यादिवशी शाळा सुरू करण्यात आल्या नाहीत. सुरु झालेल्या शाळांमध्येही विद्यार्थ्यांची अनुपस्थिती जाणवण्याइतपत ठळक होती. कोरोना संसर्गाच्या भीतीने पालकांनी मुलांना संमतीपत्रे दिली नाहीत.

त्यामुळे ४ जानेवारीला शाळा सुरू होणार की नाही, याबाबत शाळा व्यवस्थापनासह शिक्षकही संभ्रमात होते. त्यामुळे अनेक शिक्षकांच्या आरटी-पीसीआर चाचण्या झाल्या नाहीत. तसेच महापालिका प्रशासनाकडूनही शाळांची तपासणी पुर्ण झाली नव्हती. त्यामुळे सोमवारी शहरातील बहुतेक खासगी शाळा बंद राहिल्या. दरम्यान, महापालिकेने सोमवारपर्यंत ३८२ शाळांची तपासणी पूर्ण केलेली असून पालिकेच्या ४४ शाळांसह खासगी ८२ शाळांना सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे पुढील एक-दोन दिवसांत शाळा सुरू होतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चौकट

“शाळा सुरू करण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, शिक्षकांच्या आरटी-पीसीआर चाचण्या अद्याप झालेल्या नाहीत. त्याचे अहवाल मिळाल्यानंतर महापालिकेकडून तपासणी करून मान्यता मिळेल. बुधवारी शाळा सुरू होऊ शकेल.”

- कल्पना साळुंके, मुख्याध्यापिका, भारत इंग्लिश स्कुल

चौकट

“शिक्षकांची चाचणी पूर्ण न झाल्याने सोमवारी शाळा सुरू होऊ शकली नाही. बहुतेक शिक्षकांच्या चाचणीचे अहवाल एक-दोन दिवसांत मिळाल्यानंतर शाळा सुरू होईल.”

- सतिश गवळी, मुख्याध्यापक, मॉडर्न हायस्कुल

चौकट

मुले कंटाळली ऑनलाईनला

“मुले ऑनलाइन शाळेला कंटाळली आहेत. नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांना, मित्रांना भेटण्याची मुलांची उत्सुकता वाढली आहे. मुले स्वतःची काळजी घेऊन शाळेत जातील. शाळाही खबरदारी घेत आहे.”

सुदर्शना भोसले, पालक

चौकट

“शाळेने पालकांकडून संमतीपत्र मागून घेतले आहे. सर्व जबाबदारी पालकांवर सोपवली आहे. एखाद्या मुलामुळे सर्वच धोक्यात येऊ शकतात. शाळा सुरू झाल्यावर ते एकत्र येणारच आहेत. त्यातून आता नवीन ‘स्ट्रेन’ आलेला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत सोडावे का नाही, हा प्रश्न आमच्यासमोर आहे.”

-प्राची धारणे, पालक