शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीच्या लेकींची चिखलपीट; नाणे मावळात शिक्षणाची बिकट वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 03:36 IST

रस्ते व वाहतुकीची सुविधा नसल्याने विद्यार्थिनींची गैरसोय

- विजय सुराणा वडगाव मावळ : गावाजवळ शाळा नाही़ दोन ते तीन किलोमीटर दूर असलेल्या वाहतूक सुविधेच्या ठिकाणी वेळेत एसटी बस येत नाही. त्यामुळे खांद्यावर दप्तराचे ओझे घेऊन खड्डेमय रस्त्यावरून नाणे मावळातील दुर्गम भागातील सुमारे दोनशे विद्यार्थिनी शिक्षणासाठी दररोज १० किलोमीटरची पायपीट करीत आहेत. सावित्रीच्या या लेकींना गावाजवळ शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.जिल्हा परिषदेची भाजगाव येथे शाळा असून, पहिली ते सातवीपर्यंत या शाळेत विद्यार्थी शिक्षण घेतात. तेथून पाच किलोमीटर अंतरावर उंबरवाडी व कोळवाडी आहे. या ठिकाणी चौथीपर्यंत शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी तेथील मुला-मुलींना भाजगाव येथे शाळेसाठी जावे लागते. मुलींची संख्या त्यात अधिक आहे. भाजगावला जाण्यासाठी एसटी नाही. त्यामुळे दररोज १० किलोमीटरची पायपीट करावी लागते. उकसान व पाले येथेही हीच स्थिती.उकसान व पाले येथील विद्यार्थी यांची या मुलींप्रमाणेच परवड आहे. या ठिकाणी चौथीपर्यंत शाळा आहे. त्यांना ७ किलोमीटरअंतरावरील करंजगाव व कामशेत येथे शाळेत जावे लागते. हे सर्व विद्यार्थी खडकी फाट्यावर एसटी किंवा खासगी वाहनाने उतरतात. तेथून पायी जावे लागते.एकही मुलगी नाही पदवीधरनाणे मावळातील दुर्गम भागातील काही विद्यार्थिनी म्हणाल्या, आमच्या भागात गेल्या अनेक पिढ्यांपासून कोणत्याही मुलीने पदवीपर्यंत शिक्षण घेतले नाही. शिक्षणाची ही परिस्थिती बदलण्याची आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही सर्व संकटावर मात करून पायी प्रवास करत आहोत.शाळेत जाण्यासाठी रोज ४ किलोमीटरकरंजगाव येथील शाळेतही गोवित्री, उकसान, कांब्रे, करंजगाव, भाजगाव व इतर गावातील विद्यार्थी येतात. त्यांनाही रोजची पायपीट करावी लागते. या शाळेतील आसावरी कालेकर, तनवी दहिभाते, पल्लवी मोहिते, निकिता ठाकर, प्रजेत जाधव व अन्य मुलींनी सांगितले आम्हाला दररोज येऊन जाऊन चार किलोमीटर अंतर पायी चालावे लागते. शासनाने डोंगरी व दुर्गम भागातील मुलींसाठी सायकल वाटप केले पाहिजे.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण