कातकरी पाड्यावर भरली सावित्रीबाईंची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:27 IST2021-01-08T04:27:48+5:302021-01-08T04:27:48+5:30

केअर टेकर्स सोसायटीच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुळशी तालुक्यातील बेलावडे आणि दिसली या आदिवासी पाड्यांवरील मुलांना शैक्षणिक ...

Savitribai's school filled up at Katkari Pada | कातकरी पाड्यावर भरली सावित्रीबाईंची शाळा

कातकरी पाड्यावर भरली सावित्रीबाईंची शाळा

केअर टेकर्स सोसायटीच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुळशी तालुक्यातील बेलावडे आणि दिसली या आदिवासी पाड्यांवरील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. सावित्रीबाई फुलेंच्या वेशातील वर्षा शिंदे यांनी पाड्यावरील मुलांना बाराखडी शिकवली. मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित, नवा विष्णू मंडळाचे अध्यक्ष कुमार रेणुसे, विधीज्ञ सुफियान शेख, रणजित परदेशी, राजीव शिंदे उपस्थित होते. आयोजन कुमार शिंदे यांनी केले.

साईनाथ मंडळाचे अध्यक्ष पियूष शहा, सुमित आगरवाल, सुशीलकुमार देशमुख, नयन शहा, गिझाल अन्सारी, अश्विनी मेहेंदळे यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी मुलांना शैक्षणिक साहित्याबरोबर खेळणी व खाऊचे वाटप देखील केले.

कुमार शिंदे म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत केली. त्यांच्यामुळेच आज महिलांना योग्य सन्मान प्राप्त झाला आहे. त्यांच्या या कार्याला अभिवादन करण्यासाठी कातकरी पाड्यावर आगळीवेगळी शाळा भरविली.

अमोल बागुल यांनी सूत्रसंचालन केले. विष्णू दोशी यांनी आभार मानले.

Web Title: Savitribai's school filled up at Katkari Pada