शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सापडेना अधिष्ठाता नियुक्तीचा मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 07:00 IST

विद्यापीठच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित..

ठळक मुद्देमुलाखत घेतल्यानंतर काही तासात संबंधित व्यक्तीची निवड केली जाते जाहीर शासनाकडून पद भरतीला मान्यता मिळत नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून नाराजी

पुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या अधिष्ठाता पदासाठी सप्टेबर व आॅक्टोबर महिन्यात तज्ज्ञ समितीकडून पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मात्र, दोन महिने उलटून गेले तरीही अद्याप विद्यापीठ प्रशासनाला अधिष्ठात्यांची नावे जाहीर करण्यासाठी मुहूर्त सापडला नाही. त्यामुळे विद्यापीठच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.नवीन विद्यापीठ कायद्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहुतांश शैक्षणिक कामकाज पाहण्याची जबाबदारी अधिष्ठात्यांकडे आहे. त्यामुळेच विद्यापीठ प्रशासनाने तीन अधिष्ठात्यांची निवड प्रक्रिया नियमानुसार राबवून ती पूर्ण केली.त्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आणि 9 व 10  सप्टेबर रोजी मानवविज्ञान तसेच वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या अधिष्ठाता पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या.तसेच ऑक्टोबर महिन्यात  विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदासाठी मुलाखती झाल्या.या सर्व विद्याशाखेच्या अधिष्ठात्यांची निवड 4 ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाणार होती.मात्र,विधानसभेच्या निवडणुका आणि त्यानंतर आलेल्या दिवाळीच्या सुट्टीमुळे अधिष्ठात्यांची नावे जाहीर झाली नाहीत.विद्यापीठाने नियुक्त केलेल्या निवड समितीने पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेवून त्यातील अंतिम उमेदवारांची नावे विद्यापीठाकडे सुपूर्द केली आहेत.परंतु,विद्यापीठाने ही नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत.त्यामुळे शिक्षण वर्तुळात उलट -उलट चर्चा केली जात आहे. विद्यापीठाच्या मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठातापद नाशिक जिल्ह्यात प्राचार्य म्हणून कार्यरत असलेल्या अधिसभा सदस्याला मिळण्याची शक्यता वर्तविली जात असून  वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदाची सूत्रे पुण्यातील एका नामांकित मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटंंच्या संचालकाकडे जाण्याची शक्यता आहे. तर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदावर यापूर्वी विद्यापीठाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहिलेल्या व्यक्तीचीच निवड होईल,अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात काही दिवसांपासून सुरू आहे.एखाद्या शैक्षणिक पदावरील नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखत घेतल्यानंतर काही तासात संबंधित व्यक्तीची निवड जाहीर केली जाते. परंतु,विद्यापीठाने गेल्या दोन महिन्यापासून अधिष्ठात्यांची नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत. एकीकडे शासनाकडून पद भरतीला मान्यता मिळत नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून नाराजी व्यक्त केली जाते. तर दुसरीकडे विद्यापीठाकडूनच निवड झालेल्या व्यक्तिंची नावे जाहीर करण्यास विलंब केला जात आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या कार्यपध्दतीवर सवाल उपस्थित केले जात आहेत.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठ