‘कोरोना’विषयावर शनिवारी व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:14 IST2021-09-17T04:14:05+5:302021-09-17T04:14:05+5:30

पुणेः ‘सृष्टी’ संस्थेच्या वतीने, आयएमए, महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांचे ‘कोरोना…आज, उद्या आणि पुढे ? या विषयावर ...

Saturday lecture on ‘Corona’ | ‘कोरोना’विषयावर शनिवारी व्याख्यान

‘कोरोना’विषयावर शनिवारी व्याख्यान

पुणेः ‘सृष्टी’ संस्थेच्या वतीने, आयएमए, महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांचे ‘कोरोना…आज, उद्या आणि पुढे ? या विषयावर शनिवारी (दि.१८) सायंकाळी ६ वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार भूषविणार आहेत. महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विद्याधर अनास्कर आणि राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त केलेले सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. डॉ. भोंडवे यांच्या व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरांचेही सत्र होणार आहे. सध्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम निमंत्रितांसाठी असला तरी ‘सृष्टी प्रतिष्ठान’ या फेसबुकवरील खात्यातून थेट प्रक्षेपणही होणार आहे, असे ‘सृष्टी’च्या वतीने सृष्टी प्रतिष्ठानचे अध्य़क्ष सचिन नाईक यांनी कळविले आहे.

-------------------------------

Web Title: Saturday lecture on ‘Corona’