शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

भक्तिरसात न्हाऊन निघाली पुण्यनगरी !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 1:38 PM

टाळ-मृदंगाच्या तालावर मुखी अखंड हरिनामाचा गजर, भजनाच्या चालीवर ठेका धरलेल्या भगव्या पताका, भजनामध्ये तल्लीन झालेले वारकरी व डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन सहभागी झालेल्या महिला, असा वैष्णवांचा मेळा बुधवारी (दि.२६) रात्री पुण्यात विसावला...

ठळक मुद्देआज दिवसभर पालख्यांचा पुण्यात मुक्काम शुक्रवारी पहाटे पंढरपूरकडे ठेवणार प्रस्थानतुकाराममहाराज पालखीचे पाटील इस्टेट येथे दुपारी सव्वाचार वाजता आगमन याही वर्षी ज्ञानेश्वरमहाराजांची पालखीला पाटील इस्टेट चौकात येण्यास उशीर

पुणे :

कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल,कानडा विठ्ठल विटेवरीकानडा विठ्ठल नामे बरवा, कानडा विठ्ठल हृदयी घ्यावा!विठ्ठलाच्या भेटीची लागलेली आस... वरुणराजाच्या हलक्या सरींनी केलेली सुखाची पखरण... टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर वारकºयांनी धरलेला फेर.... ज्ञानोबा, तुकोबांचा जयघोष... आकाशाला गवसणी घालू पाहणाºया भागवत धर्माची फडकत असणारी पताका... अशा भक्तिमय वातावरणात पुणेकरांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज आणि संतशिरोमणी तुकाराममहाराज या दोन्ही पालख्यांचे स्वागत केले. श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान ठेवलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज आणि संतशिरोमणी तुकाराममहाराज या दोन्ही पालख्यांनी बुधवारी (दि. २६) पुण्यनगरीमध्ये दिमाखात प्रवेश केला.  

टाळ-मृदंगाच्या तालावर मुखी अखंड हरिनामाचा गजर, भजनाच्या चालीवर ठेका धरलेल्या भगव्या पताका, भजनामध्ये तल्लीन झालेले वारकरी व डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन सहभागी झालेल्या महिला, असा वैष्णवांचा मेळा बुधवारी (दि.२६) रात्री पुण्यात विसावला. श्री संत तुकाराममहाराज आणि श्री संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन होताच शहराचे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. 

तुकाराममहाराज पालखीचे पाटील इस्टेट येथे दुपारी सव्वाचार वाजता आगमन झाले, त्या वेळी महापौर मुक्ता टिळक यांनी पालखीचे स्वागत केले. या वेळी महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.

निवास मंडपात पालखी सुमारे अर्धा तास स्थिरावली. सर्व दिंड्यांमध्ये विठूनामाचा गजर केला आणि अवघे वातावरण ‘विठू’मय झाले. वारकरी महिलांनी फुगडीचा फेर धरला होता. आबालवृद्धांनी फुगडीचा आनंद लुटला. पालखीचे दर्शन घेण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन पालखीचे औक्षण केले. भजनाच्या तालावर महिलांनी फेर धरला आणि पालखी पुढे मार्गस्थ झाली.........याही वर्षी ज्ञानेश्वरमहाराजांची पालखीला पाटील इस्टेट चौकात येण्यास उशीर झाला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांची पालखी सायंकाळी साडेसहाला पाटील इस्टेट येथे स्थिरावली. दोन्ही पालख्यांमध्ये दोन तासांचे अंतर पडले. पालखी मार्गावर पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती.........संचेती चौकातून या दोन्ही पालख्या शिवाजीनगर, फर्ग्युसन रस्त्याने ज्ञानेश्वर पादुका चौक आणि तुकाराम पादुका चौकात आल्या. त्या ठिकाणी आरती झाल्यावर पालख्या खंडूजीबाबा चौकातून लकडी पुलावरून लक्ष्मी रस्त्याने मुक्कामाच्या ठिकाणाकडे मार्गस्थ झाल्या. संत तुकाराममहाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठ्ठल मंदिरात रात्री मुक्कामी विसावली, तर ज्ञानेश्वरमहाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात रात्री मुक्कामाला पोहोचली......वारकऱ्यांसाठी पुणेकरांची सेवा  वारकऱ्यांना विविध संस्था आणि संघटनांकडून पाणी, बिस्किटे, पिशव्या आदी साहित्याचे वाटप करण्यात येत होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे कर्मचारी, अधिकारी यांनी मंडप उभारून विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती तसेच संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीही बसवल्या होत्या. या चारही मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने मोफत चप्पल आणि बॅग यांची दुरुस्ती करुन देण्यात येत होती. 

.......... संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर येथे रात्री पावणेदहाच्या सुमारास मुक्कामी पोहोचला. तर, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी रात्री सुमारे १० वाजता भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात विसावली. गुरुवारी (दि.२७) रोजी दोन्ही पालख्यांचा मुक्काम पुण्यनगरीत असेल. शुक्रवारी (दि. २९) पहाटे परंपरेनुसार दोन्ही मंदिरांतील विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींची विधिवत पादुकांवर अभिषेक होईल. त्यानंतर काकड आरती होऊन दोन्ही पालख्या पुण्यातून मार्गस्थ होतील. ...............

दोन्ही पालखी सोहळ्यातील तील वारकऱ्यांनी शहराच्या विविध भागांत मुक्काम केला. या मुक्कामाच्या ठिकाणी विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांनी वारकयांसाठी मिष्टान्न भोजनाची व्यवस्था केल्या. वारकºयांनी-देखील मुक्कामाच्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत कीर्तन-भजन करून भक्तीसेवा केली.  

पुणे महापालिकेकडून पालख्यांचे स्वागतपुणे महापालिकेच्या वतीने पाटील इस्टेट येथे संत तुकाराममहाराज आणि संत ज्ञानेश्वरमहाराज या दोन्ही पालख्यांचे महापौर मुक्ता टिळक यांनी स्वागत केले. महापौराच्या हस्ते दोन्ही पालख्यांमध्ये सहभागी दिंडीप्रमुख आणि विणेकरी यांचा श्रीफल आणि तुळशीची रोपे देऊन स्वागत करण्यात आला. या वेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंड, अतिरिक्त आयुक्त रुबेल अग्रवाल, डॉ. विपिन शर्मा उपस्थित होते. तर, दापोडी येथील श्री संत तुकाराममहाराज पालखी विसावा ठिकाणी महापौर मुक्ता टिळक आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पालखीचे स्वागत केले.............

 

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPandharpur Wariपंढरपूर वारी