शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
2
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
3
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
4
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
5
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
6
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
7
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
8
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
9
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
10
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
11
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
12
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
13
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
14
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
15
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
16
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
17
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
18
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ
19
उल्हासनगर: आधी विनयभंग, तुरुंगातून बाहेर येताच पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा व फटाक्याची आतिषबाजी
20
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल

अश्लील व्हिडिओ दाखवून शरीर संबंधाची जबरदस्ती; सासूकडून काळी जादू, चोंधेंच्या सुनेचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 16:36 IST

लग्नात दोन लाख रुपये आणि सोनं देऊनही पैशांची वारंवार मागणी केली जात होती, दीर आणि नवरा हे सासूसमोर गांजा पित असतं

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना मदत करणाऱ्या संकेत चोंधेच्या कुटुंबाचा धक्कादायक कारनामा समोर आला आहे. चोंधे याच्यावर मंगळवारी रात्री अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता एक नवे प्रकरण समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे हे फरार असताना ज्या गाडीमधून फिरत होते. त्या गाडीच्या मालक हा संकेत चोंधे आहे. त्याच्यावर पत्नीच्या कौटुंबिक छळाचा आरोप आहे. वीस लाख हुंड्यासाठी त्याने पत्नीची छळ केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

चोंधे कुटुंबातील नवरा, दीर आणि सासरच्या जाचामुळे विवाहितेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी खडक पोलीस स्टेशन आणि महिला आयोगाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई नसल्याचा दावा करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार नवरा सुयश चोंधे आणि दीर संकेत चोंधे सासरा नरेश चोंधे सासू वैशाली चोंधे यांच्या विरोधात पाच महिन्यांपूर्वी पोलीस स्टेशनला आणि चार महिन्यांपूर्वी महिला आयोगाला तक्रार करण्यात आली होती. मात्र कोणतीही दखल घेतली गेली नाही. असा दावा धनश्री चोंधेकडून करण्यात आला. 

विवाहितेने आरोप केलाय की, लग्नात दोन लाख हुंडा आणि दोन तोळे सोनं दिलं होतं. लग्नानंतरही वारंवार पैशाची मागणी केली जात होती. सासू काळी जादू करायची. वीस लाख हुंड्याची मागणी करत छळ आणि मारहाण करण्यात आली. नवरा सासूसह सासरा आणि दिरानेही धनश्रीवर अत्याचार केले. याप्रकरणी तिच्या सात फेब्रुवारीला खडक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. धनश्रीचा नवरा सुयशने अश्लील व्हिडिओ दाखवून जबरदस्ती करून शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली होती. मला सासूने काळी जादू करण्यासाठी भाग पडल्याची गंभीर आरोप धनश्रीने केले आहेत.

सुयशच्या पत्नीने आणखीन एक धक्कादायक आरोप करताना म्हटलंय की, सासू वैशाली चोंधे काळी जादू करत होती. लग्नात दोन लाख रुपये आणि सोनं देऊनही पैशांची वारंवार मागणी केली जात होती. तिच्या म्हणण्यानुसार नवऱ्याने अश्लील व्हिडिओ दाखवत शरीर संबंधासाठी दबाव आणला. दीर आणि नवरा हे सासूसमोर गांजा पित असत. सुयश चोंधे व संतोष चोंधे त्यांच्या गाडीला लाल दिवा लावून मुळशीमध्ये फिरत होते. लाल दिवा वापरण्यास बंदी असतानाही गाडीचा गैरवापर चोंधे यांनी केला असल्याचे पत्नीने सांगितले आहे. 

 

 

टॅग्स :PuneपुणेVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारMONEYपैसा